विकास कामे केलेल्या ठेकेदारांची बिले अदा करावी - संपत बारस्कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

विकास कामे केलेल्या ठेकेदारांची बिले अदा करावी - संपत बारस्कर

 विकास कामे केलेल्या ठेकेदारांची बिले अदा करावी - संपत बारस्कर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर शहरामध्ये मनपाच्या माध्यमातून विविध योजने अंतर्गत ठेकेदार विकास कामे करित असतात ठेकेदारांकडून शहरातील कामे पूर्ण होवूनही मनपा प्रशासनाकडून या ठेकेदारांना झालेल्या कामांची बिले अनेक वर्षापासून दिलेले नाहीत त्यामुळे या ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या ठेकेदारांनी व्याजानी पैसे घेवून तसेच सोने तारण ठेवून ही कामे केली आहेत. आज यांच्याकडे उपजिवीका भागविण्यासाठी पैसे नसल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी मनपाने या ठेकेदारांची बिले लवकरात लवकर अदा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपाचे विरोधीपक्ष नेते मा.श्री.संपत बारस्कर यांनी केली. यावेळी नगरसेवक मा.श्री.कुमार वाकळे, मा.श्री.विनीत पाऊलबुधे, मा.डॉ.श्री.सागर बोरूडे यांनी उपोषणाला बसलेल्या ठेकेदारांची भेट घेवून पाठींबा दिला.मनपाचे ठेकेदार बिल मिळण्यासाठी मनपा प्रवेशाद्वारावर उपोषणाला बसले आहेत. यावेळी संपत बारस्कर म्हणाले की, नगर शहरातील युवक आपले शिक्षण पूर्ण करून ठेकेदारी व्यवसायाकडे वळाले आहेत. विविध प्रभागामध्ये हे ठेकेदार नगरसेवकांच्या व प्रशासनाच्या सुचनेनुसार काम करित असतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here