आनंदऋषीजी ब्लड बँकेत मोफत मणके विकार उपचारांची व्यवस्था - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

आनंदऋषीजी ब्लड बँकेत मोफत मणके विकार उपचारांची व्यवस्था

 आनंदऋषीजी ब्लड बँकेत मोफत मणके विकार उपचारांची व्यवस्था

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर : राष्ट्रसंत आनंदऋषीजी हॉस्पिटलच्यावतीने आनंदऋषीजी ब्लड बँक येथे सूक्ष्म व्यायाम पध्दतीव्दारे मणके विकार उपचारांची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. मधल्या काळात कोविडमुळे बंद झालेली असलेली ही मोफत आरोग्य सेवा दि.1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होत आहे.  झालेल्या आतापयर्ंत शेकडो रूग्णांना विनाऔषधी सूक्ष्म व्यायामाव्दारे दिर्घकाळच्या वेदनेतून मुक्ती मिळाली. त्यामुळे आता दररोज सकाळी 10 ते 11 यावेळेत उपचार पध्दतीचा लाभ रूग्णांना घेता येणार आहे, अशी माहिती सूक्ष्म व्यायाम पध्दती उपचार तज्ज्ञ प्रसाद जोशी यांनी दिली. या उपक्रमासाठी स्व.श्रीमती पानाबाई लक्ष्मीचंदजी रूणवाल (विजापूर,कर्नाटक) या परिवाराचे सहकार्य लाभले आहे.
   कंबरदुखी, पाठदुखी, मानेचे दुखणे, गुडघेदुखी आदी विकारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांना व्यायामाच्या साध्यासोप्या व तितक्याच परिणामकारक पध्दतीबाबत याठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून या विकारांनी त्रासलेल्या रूग्णांना फक्त व्यायामाव्दारे या त्रासातून मुक्तता  मिळवता येणे शक्य आहे. सतत मुंग्या येणे, पूर्ण पाय दुखणे, मान अवघडणे, हातापायाला बधिरता येणे अशी लक्षणे असलेल्या रूग्णांनी वेळीच उपचार घेतल्यास मोठी व्याधी टळू शकते. या उपचारपध्दतीचा नगर शहर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील रूग्णांनी लाभ घेतला आहे.
   या उपचार पध्दतीचा जास्तीत जास्त रूग्णांना लाभ मिळण्यासाठी मणकेविकारग्रस्त रूग्णांसाठी आनंदऋषीजी ब्लड बँकेत कायमस्वरुपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी मणके विकाराची कारणे, मणक्याचा त्रास सुरू झाल्यावर घ्यावयाची काळजी, सूक्ष्म व्यायाम पध्दतीचे फायदे आदींबाबत सखोल माहिती देण्यात येते. इच्छुकांनी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 9921272306 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment