ऊसतोड मजुराच्या मुलाला ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

ऊसतोड मजुराच्या मुलाला ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान

 ऊसतोड मजुराच्या मुलाला ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

निघोज ः राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य सेवेबद्दल दिला जाणारा महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्काराने कवी संदिप राठोड यांना सन्मानित करण्यात आले.
   संदिप राठोड हे बिड जिल्हा गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी मोठा तांड्याचे रहीवाशी असुन सध्या ते अहमदनगर जिल्ह्यातील निघोज या ठिकाणी स्थायीक झालेले आहे.
   ’दैनिक नगरी दवंडी’शी बोलताना कवी संदिप राठोड यांनी सांगीतले की,सदर पुरस्कार स्विकारताना आई व मोठे बंधु उपस्थीत होते. ऊसतोड मजुराच्या लेकराचा झालेला सन्मान पाहून आईच्या डोळयातून ओघळणार्‍या आनंदाश्रुंनी काळीज गहिवरून आले.
   साहित्य सेवेबद्दल लेखणीचा झालेला गौरव नक्कीच जबाबदारी वाढवणारा आहे तसेच मिळालेला ग्रंथमित्र पुरस्कार आनंद देण्याबरोबर नवनिर्मितीला चालना देणारा आहे.समाजहिताचे नितिमूल्ये जपत यापुढेही अवितर साहित्य सेवा करत राहू तसेच वाचण संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी योगदान देऊ असेही त्यांनी सांगीतले.
   कवी संदिप राठोड यांना पुरस्कार मिळताच जन्मभूमी व कर्मभूमीतून त्यांचे पेढे वाटून अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment