दौड-मनमाड मार्गावर मालगाडीचे 12 डबे घसरले.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

दौड-मनमाड मार्गावर मालगाडीचे 12 डबे घसरले..

 दौड-मनमाड मार्गावर मालगाडीचे 12 डबे घसरले..

सर्व रेल्वेगाड्या मनमाड-नाशिकमार्गे वळवल्या,युद्धपातळीवर डबे उचलण्याचे कार्य सुरू !

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
श्रीगोंदा ः सोलापूर-दौंड-मनमाड मध्य रेल्वेच्या मार्गावर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा स्टेशनपासून तीन किलोमीटरवर दौंडकडून नगरच्या दिशेने जाणार्‍या मालगाडीचे 12 डबे घसरले. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर सर्व रेल्वेगाड्या मनमाड-नाशिक-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या आहेत.
    काल  मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. या अपघातामुळे सोलापूर-दौंड-मनमाड मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या मनमाड-नाशिक-कल्याणमार्गे वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वे मार्गावरील डबे रुळावर आणण्यासाठी मध्यरात्रीपासून युद्धपातळीवर कार्य सुरू आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत हा मार्ग रेल्वे गाड्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
रेल्वेडबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला मालवाहतूक करणारी रेल्वे असल्याने कोणतीही जीवीतिहानी किंवा कुणीही यात जखमी झालेले नाही. परंतु रेल्वे रुळांचं मात्र मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून या रेल्वे अपघातामुळे दौंड नगर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या मागील स्टेशनवरच रोखण्यात आल्या आहेत सिमेंट वाहतूक करणार्‍या या मालवाहतूक गाडीला 42डबे होते त्यातील 12डबे रुळावर घसरले सदर घटनेबाबत बेलवंडी व श्रीगोंदा सर्व रेल्वेगाड्या मनमाड-नाशिकमार्गे वळवल्या, युद्धपातळीवर डबे उचलण्याचे कार्य सुरू
   पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर पेट्रोलिंग करणार्‍या पो उपनिरीक्षक गट,व पो कॉ प्रकाश मांडगे यांनी अपघातस्थळी धाव घेतली रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार आहे बुधवार सायंकाळपर्यंत या मार्गावरील रेल्वे वाहतूक बर्‍याच वेळेसाठी ठप्प राहणार आहे. सदर घटनेबाबत बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर पेट्रोलिंग करणार्‍या पो उपनिरीक्षक गट,व पो कॉ प्रकाश मांडगे यांनी अपघातस्थळी धाव घेतली.

No comments:

Post a Comment