ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी आता 7वी पास ची अट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी आता 7वी पास ची अट

 ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी आता  7वी पास ची अटनगरी दवंडी

मुंबई :कोरोनामुळे अनेक ग्रामपंचायत, मनपाच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. आता राज्यात अनेकठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका लागल्याने सर्व पुढार्‍यांना स्फुरण चढले आहे. मात्र अशातच एक मोठी बातमी आल्याने अनेकांचा मूड हाफ होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले असताना, गल्लीपासून मुंबईपर्यंत निवडणुकीची चर्चा चालू असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.आता उमेदवारांना ही आणि इथून पुढची ग्रामपंचायत निवडणूक लढायला अवघड जाणार आहे. कारण निवडणूक आयोगाने आता उमेदवारीसाठी 7 पासची अट घातली आहे. उमेदवारी अर्जसोबत सातवी पास असल्याचा दाखला जोडणे बंधनकारक असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता अंगठेबहाद्दर राजकारणाच्या रिंगणातून बाहेर होणार आहेत.याआधीही सातवी पासची अट होती मात्र ती फक्त सरपंचांना होती. आता मात्र ही अट सदस्यांनाही लागू केली जाणार आहे. 1 जानेवरी 1995 नंतरचा जन्म असलेल्या उमेदवारांना ही अट लागू आहे. 1995 च्या आधी जन्मलेल्या पुढार्‍यांना मात्र ही अट लागू नाही. गावातल्या अंगठेबहाद्दर पुढार्‍यांना हा मोठा झटका आहे

No comments:

Post a Comment