नियोजित दौर्‍यासाठी आरपीआयची बैठक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

नियोजित दौर्‍यासाठी आरपीआयची बैठक

 नियोजित दौर्‍यासाठी आरपीआयची बैठक

केंद्रीय राज्यमंत्री आठवले दि.27 ला जिल्हा दौर्‍यावर


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या दि.27 व 28 डिसेंबर रोजी नगर जिल्हा दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन येथील भिमराज बुध्दविहार येथे बैठक पार पडली. यामध्ये ना. आठवले यांच्या नियोजित दौर्‍याचे नियोजन करण्यात आले.
बैठकीचे प्रारंभ भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आले. सदर बैठकित ना. रामदास आठवले यांचा दि.25 डिसेंबरचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.आरपीआयच्या वतीने रक्तदान शिबीर, रुग्णांना फळ, मिष्टान्न भोजन वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व गरजूंना विविध प्रकारची मदत करण्यात येणार आहे. तसेच ना. आठवले यांच्या उपस्थितीमध्ये सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्याचे नियोजन करण्यात आले. सभासद नोंदणीत एका सभासदाने 50 सभासद केल्यास तो क्रियाशिल सभासद ठरणार आहे. जो कार्यकर्ता क्रिशाशील सभासद असेल त्यालाच शाखेचा अध्यक्ष किंवा तालुका व जिल्हा पदाधिकारी होता येणार आहे. क्रियाशील कार्यकर्त्याकडे पक्षाची महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याने त्याला 50 सभासद करणे आवश्यक असल्याचे आरपीआयच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
    आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे म्हणाले की, दि.27 व 28 डिसेंबर रोजीचा ना. रामदास आठवलेंचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. 27 डिसेंबरला ते पुण्याहून संगमनेरला येणार आहे. शिर्डीला उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकार्यांची बैठक होऊन निधन झालेल्या पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन ना. आठवले करणार आहेत. 28 डिसेंबरला संध्याकाळी शहरातील त्यांचे निष्ठावान दिवंगत कार्यकर्ते विजयकांत चाबुकस्वार यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत. तसेच आरपीआय मराठा आघाडीचे सिध्दार्थ सिसोदे यांच्या सावेडी येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अमित काळे म्हणाले की, ना. आठवले यांच्या वाढदिवशी भिंगार येथील दोनशे कार्यकार्त्यांचा पक्ष प्रवेश केला जाणार आहे. यावेळी सामाजिक उपक्रम घेऊन दुर्बल घटकांना मदत केली जाणार आहे. तसेच आरपीआयच्या माध्यमातून युवकांना नेतृत्व दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीस युवक शहराध्यक्ष अमित काळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, संजय कांबळे, विजय भांबळ, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, राज्य संघटक मराठा आघाडी सिद्धार्थ सीसोदे, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, अविनाश भोसले, दिपक गायकवाड, विशाल कांबळे, मंगेश मोकळ, महादेव भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, राहुल गायकवाड, विशाल साबळे, सुशिल साळवे, विवेक भिंगारदिवे, प्रविण चाबुकस्वार, राजू जगताप आदिंसह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment