जवळ्यात म्हातारा नवरा, गुडघ्याला बाशिंग.....! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, December 5, 2020

जवळ्यात म्हातारा नवरा, गुडघ्याला बाशिंग.....!

 जवळ्यात म्हातारा नवरा, गुडघ्याला बाशिंग.....!

नवरदेव पुत्राकडून मध्यस्थाला चोप

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः जवळे (ता. पारनेर) येथील दोघा जिवलग  आजोबा   नवरदेवांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. अन .... गुपचुप  विधिवत  विवाहही  केला आहे.
     आपल्या वडीलांनी गुपचुप लग्नगाठ बांधल्याची कुणकुण त्यातील एकाच्या मुलाला लागताच त्याने त्यांच्यावर पाळत ठेवली असता आपल्या  वडीलांनी शेजारच्या गावात आपला नवीन संसार  थाटल्याची खात्री झाली. आपल्या वडिलांचे लग्न जुळवणार्‍या मध्यस्तीचा शोध  नवरदेव पुत्राला लागताच,त्याने आपले मित्र सोबत घेवून त्या  मध्यस्थाचे घर  गाठले अन  त्याला बेदम चोपही दिला. मध्यस्थाची मुलेही आपल्या  पित्याला मारहाण केल्याने चवताळली अन  आपल्याला मारहाण केलेल्या नवरदेव पुत्राला घरात घुसून चोप देवून बरोबरी साधली.
     या भांडणाला टोळीयुद्धाचे स्वरूप आल्याची खबर पारनेर पोलिसांना समजताच अर्नथ होवू नये म्हणून घटनास्थळी येवून दोन्हीना ताब्यात घेतले. पुढे  दोघेही  आपलेच  कसे बरोबर याचा दावा पोलिसांसमोर करू लागले.
     पोलिसांनी अधिक चौकशी केली  असता ताब्यात घेतलेल्या नवरदेवासह मध्यस्थानेही  नवा संसार थाटल्याची माहीती  उघड झाली.  या दोघाही जिवलग मित्रांनी सुमारे दोन महीन्यापुर्वीच  एकसाथ नवीन संसार थाटला होता. परंतु या गुपचुप संसाराची  खबर  घरच्यांना लागू दिली नव्हती. या दोघाही नवरदेव व त्यांच्या समर्थकांनी  आता माघार घेवून विषय मिटवण्याची भुमिका घेतली.
     पोलिसांनी दोघाही नवरदेव व  समर्थकांना शांतता राखण्याचे नोटीस देवून सोडुन दिले.
विशेष म्हणजे या दोघाही नवरदेवांना  बायको, मुले, मुली नातवंडे आहेत. म्हातारा नवरा..... ! अन्....गुडघ्याला बाशिंग..... ! या म्हणीची   कालपासुन जवळा परिसरात खमंग चर्चा  आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here