बलात्कार प्रकरणातील कांबळे याला अटकपूर्व जमीन मंजूर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 5, 2020

बलात्कार प्रकरणातील कांबळे याला अटकपूर्व जमीन मंजूर

 बलात्कार प्रकरणातील कांबळे याला अटकपूर्व जमीन मंजूर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश गुंजीकर साहेब यांनी बलात्कार प्रकरणातील आरोपी धनंजय कांबळे याला ड सचिन झालटे पाटील आणि ड सागर शिंदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत अटक पूर्व जमीन मंजूर केला.
   श्रीगोंदा येथे शासकीय निवासस्थानी कुटुंबासह राहत असलेला विजय कांबळे याचा भाऊ धनंजय याचे त्यांच्या शेजारीच राहत असलेल्या मुली बरोबर प्रेमसंबंध जुळून आले होते. आरोपी याची बदली झाल्याने तो जामखेड येथे राहण्यास गेला असताना पिडीत मुलगी ही आरोपीस भेटण्यासाठी वारंवार त्याच्या रूम वरती जात होती त्यामुळे त्यांच्यात शरीर संबंध आले होते. ही बाब पीडितांची नातेवाईकांना समजताच त्यांनी त्या बाबत विचारणा केली त्यानी सर्व आरोप फेटाळून लावले. तर धनंजय याने पिडीत मुलीला लग्नास नकार दिला होता. त्यामुळे पिडीत मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन 24 जून रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी धनंजय त्याचा भाऊ विजय आणि आणि भावजई विजया यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. आरोपी धनंजयच्या वतीने ड सचिन झालटे पाटील आणि ड सागर चंद्रकांत शिंदे यांनी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जमीन अर्ज दाखल करत युक्तिवाद करताना सांगितले की आरोपी विरुध्द फिर्याद उशिराने दाखल करण्यात आली असून पिडीत मुलगी घटनेच्या वेळी सज्ञान होती आणि तिला आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केलेले नाही तसेच इतर आरोपींना औंरंगाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. केलेला युक्तिवाद मान्य करून आरोपी धनंजय कांबळे याला श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम. गुंजिकर साहेब यांनी अटक पूर्व जमीन मंजूर केला.

No comments:

Post a Comment