उस्थळ दुमाला ग्रामपंचायत बिनविरोधच्या दिशेने...? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

उस्थळ दुमाला ग्रामपंचायत बिनविरोधच्या दिशेने...?

 उस्थळ दुमाला ग्रामपंचायत बिनविरोधच्या दिशेने...?

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः गावाचा एकोपा ,एकसंघ पणा हा गावाचा आत्मा आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत भावकित, गावात संघर्ष उभा राहतो, पाच वर्षे रक्ताची नाती असणारे ,मित्र असणारे एकमेकांचे शत्रू बनतात. निवडणुकांमधून पुढार्‍यांचे राजकारण सुरू राहते पण गावचे गावपण संपून जाते.त्यामुळे उस्थळ दुमाला ता.नेवासा  ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा.पुढे प्रत्येकाने आपापले पक्षीय राजकारण कसेही करा पण गावाचे गावपण ,जिव्हाळा ,प्रेम नष्ट होऊ देऊ नका असे आवाहन गावातील युवकांनी यांनी केले.त्यानुसार उस्थळ दुमाला ग्रामपंचायत बिनविरोध करण्यावर ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केले असून लवकरच बिनविरोधची घोषणा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे .
     गावचा विकास थांबवण्यासाठी अंतर्गत वाद कारणीभूत असतात, ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावागावात गटबाजी , भांडणे वाद होतात व त्यातून भाऊबंदकी सुरू होते त्यामुळे गावचा विकास थांबतो,त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर गावाच्या विकासाला चालना मिळेल यासाठी प्रयत्न करा असा सल्ला उस्थळ दुमाला  येथील युवकांनी दिला असून नेवासा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यावर एकमत होत असतानाच उस्थळ दुमाला  येथील जनतेनेही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.
     यावेळी गावातील युवकांनी एकत्र येत  निवडणूकांमुळे गावात होणारे वाद,तंटे, भावकितील संघर्ष यांचा गावाच्या एकोप्यावर आणि विकासावर कसा परिणाम होते हे सर्व गावकर्‍यांना सविस्तर सांगितले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदार यांच्या निवडणूक वेळी कोणी कोणाचेही काम करा, आपापला पक्ष धरा पण गावातील आणि भावकीतील संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करा असे कळकळीचे आवाहन केले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उस्थळ दुमाला  ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा जवळ जवळ  निर्णय झालेला असून, गावातील एकोपा आणि भावकितील एकता टिकण्यासाठी,व निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीच्या प्रचारावर होणारा पैसा आणि वेळ यांची बचत होऊन परंपरागत चालत आलेले राजकीय वैर संपुष्टात येण्यास मदत होणार आहे तर गावातील जाणत्या लोकांनी एकत्र बसून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा.अशी युवकांची भावना आहे.

No comments:

Post a Comment