महावीर इंटरनॅशनल वीरा केंद्राकडून पिडित महिलेस शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

महावीर इंटरनॅशनल वीरा केंद्राकडून पिडित महिलेस शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य

 महावीर इंटरनॅशनल वीरा केंद्राकडून पिडित महिलेस शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य


नगरी दवंडी/प्रतिनिधी

राहुरी ः ठेवीदारांच्या विश्वासाच्या आधारावर प्रेरणा पतसंस्थेने 51 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केला .आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.
    त्यांचे नेतृत्वाखालील प्रेरणा पतसंस्था व प्रेरणा मल्टीस्टेट च्या वतीने 2021 कँलेंडर प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते .पतसंस्थेच्या राहुरी येथील सभागृहात हा समारंभ झाला .अध्यक्षस्थानी प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे होते.
      माजी खासदार प्रसाद तनपुरे पुढे म्हणाले ,प्रेरणा पतसंस्थेने तालुक्याच्या जिरायती दुष्काळी भागाचा चेहरामोहरा बदलला आहे .तेथील शेती ,उद्योग यांच्या विकासाला प्रेरणा पतसंस्थेच्या अर्थसहाय्य यामुळे वेगळी दिशा मिळाली आहे .शेती समृद्ध झाली आहे .आर्थिक काटकसर व संस्थेच्या हिताच्या कारभारामुळे सभासदांचा, ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास वाढला दिवसेंदिवस वाढतो आहे.संस्था बदलत्या काळानुसार बदलत तिने कामकाजात अत्याधुनिकतंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे ग्राहकांनातत्परतेने बँकींग सुवीधा मिळत आहेत. अनेक सुशिक्षित, बेरोजगार,छोटे शेतकरी, दुकानदार यांना आर्थिक आधार दिल्याने त्यांच्या जीवनात परीवर्तन झाले आहे. त्यामुळेच संस्था प्रगती चे टप्पे ओलांडत आहे. संस्थापक अध्यक्ष सुरेश साबळे यांनी सांगितले की ,नवीन वर्षापासून प्रेरणा पतसंस्था सभासदांसाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहे .संस्थेच्या प्रगतीत सभासद ,ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासाचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
      साई आदर्श मल्टीस्टेट चे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे ,प्रेरणा चे उपाध्यक्ष विष्णुपंत वर्पे,,संचालक प्रा.वेणुनाथ लांबे ,अँड. जगन्नाथ डौले,विशेष लेखापरीक्षक सुरेश डौले, जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे, अनिल वर्पे,शाखाधिकारी संजय माळवदे रवींद्र हिवाळे आदी मान्यवर यावेळी हजर होते प्रेरणा पतसंस्थेचे दैनंदिनी प्रकाशन करण्याचे हे तेवीसावे वर्ष आहे.

No comments:

Post a Comment