रमेश फिरोदिया महाविद्यालयात महारक्तदान शिबीर संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

रमेश फिरोदिया महाविद्यालयात महारक्तदान शिबीर संपन्न

 रक्तदान हेच श्रेष्ठ दान ः शंकरराव खेमनर

रमेश फिरोदिया महाविद्यालयात महारक्तदान शिबीर संपन्न  

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  राष्ट्रीय सेवा योजना व रमेश फिरोदिया कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार दिनांक  22/12 /2020 रोजी महारक्तदान शिबीर संपन्न झाले.  उजतखऊ  -19 या साथीच्या आजारामुळे रक्त साठ्याचा तुटवडा भासत आहे. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, हा उद्देश समोर ठेवून महाविद्यालयाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
    या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. शंकरराव पाटील खेमनर व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा.दिपक काका फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी अर्पण ब्लड बँकेचे डॉ.अजय वाकचौरे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन घोलप, उपप्राचार्य प्रा.गिरी आर आर. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. खेमनर एम. टी. व सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment