18 डिसेंबरच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा : सौ. दुसुंगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

18 डिसेंबरच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा : सौ. दुसुंगे

 18 डिसेंबरच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा : सौ. दुसुंगे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासाः राज्य शिक्षण विभागाने 11.12.20 रोजी काढलेला जीआर रद्द करावा व अनुदान पात्र शाळांना अनुदानाची तरतूद करावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री विजयनवल पाटील  यांनी शुक्रवारी बंदची हाक दिलेली आहे. जिल्ह्याची उपाध्यक्षा तसेच प्रदेश सदस्या (महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ) म्हणून मी सर्व संस्थाचालकांना विनंती करते की जिल्ह्यातील सर्व संस्थाचालकांनी शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पद रद्द करण्याबाबतचा जीआर मागे घ्यावा व अनुदानाची तरतूद करावी तसेच सर्व शाळांना वेतनेतर अनुदान आदा करावे म्हणून बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी सौ. शिल्पाताई दुसुंगे यांनी केले.

No comments:

Post a Comment