डॉ. पठारे यांच्यातर्फे पारनेरकरांसाठी रुग्णवाहिका सुपूर्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 18, 2020

डॉ. पठारे यांच्यातर्फे पारनेरकरांसाठी रुग्णवाहिका सुपूर्द

 डॉ. पठारे यांच्यातर्फे पारनेरकरांसाठी रुग्णवाहिका सुपूर्द


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेरः तालुक्यातील जनतेसाठी रात्री अपरात्री व रुग्णांना गरजेची असणारी रुग्णवाहिका पारनेरकरांसाठी अत्यल्प दरात ओंकार हॉस्पिटलचे संचालक व पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी ही रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी सुपूर्द केली आहे. जवळा गणातील नागरिकांसाठी ही रुग्णाहाविका मोफत असल्याचे डॉ पठारे यांनी जाहिर केले आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना.विजयराव औटी यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले.
पारनेर तालुक्यातील जनतेला खर्‍या अर्थाने आज रुग्णवाहिकेची गरज होती.कोरोना ची परिस्थिती असल्याने नागरिकांना हॉस्पिटल पर्यंत पोहचण्यासाठी सुरक्षित वाहने मिळत नाहीत. नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी डॉ पठारे यांनी जनतेची खरी गरज ओळखून जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका दिली आहे. डॉ पठारे यांचे हे सामाजिक काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ना. विजयराव औटी यांनी काढले. डॉ पठारे यांचा आदर्श घेऊन सर्वांनी समाजाप्रती आदर ठेऊन समाजपयोगी कामे करण्याचे आवाहन देखील यावेळी औटी यांनी केले.
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष  ना.विजयराव औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर या रुग्णवाहिकेचे पूजन ना. विजयराव औटी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, तालीम संघाचे अध्यक्ष पै. युवराज पठारे माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, शिवसेना शहरप्रमुख निलेश खोडदे, गटप्रमुख बाबासाहेब रेपाळे, प्रमोद पठारे, सरपंच प्रभाकर गुंजाळ, उपशहरप्रमुख संदीप मोढवे, प्रशांत निंबाळकर, भाऊसाहेब चत्तर, शाम पठारे, पराजी औटी, संपतराव औटी, सुभाषराव कावरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित हो
ते.

जनसेवा हीच ईश्वरसेवा हाच ध्यास डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक काम करत आहे. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य जनतेच्या सेवा करता यावी या उद्देशाने ही रुग्णवाहिका जनतेच्या सवेत अर्पण केली आहे.
डॉ. श्रीकांत पठारे (पंचायत समिती सदस्य)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here