अंगावर घाण पडल्याचा बनाव करत केले इतके रुपये लंपास - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

अंगावर घाण पडल्याचा बनाव करत केले इतके रुपये लंपास

 अंगावर घाण पडल्याचा बनाव करत केले इतके रुपये लंपासनगरी दवंडी

श्रीगोंदा प्रतिनिधी : 

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे अंगावर घाण पडल्याचे सांगत अज्ञात चोरट्याने गाडीच्या हॅण्डलला लावलेल्या पिशवीतील ९५ हजार रुपये लंपास केले प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

                    या बाबत सविस्तर असे की येळपणे येथील तात्या किसन गावडे वय ५७ यांचे सोसायटीकडून मंजूर झालेले ९५ हजाराचे पीक कर्ज बेलवंडी येथील सहकारी बँकेत जाऊन काढून घेत पिशवीत ठेवले. रकमेची पिशवी गाडीच्या हॅण्डलला लावली असता गावडे यांना अज्ञात चोरट्याने तुमच्या कपड्यावर घाण पडली आहे असे सांगितले. घाण स्वच्छ करण्यास गावडे जवळील हॉटेल मधे गेले असता हॅण्डलची ९५ हजार रुपये रकमेची पिशवी त्या चोरट्याने लंपास करत चोरटा फरार झाला. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार मधुकर सुरवसे करत आहेत.

No comments:

Post a Comment