कर्जत नगर पंचायतचा अनोखा उपक्रम थुंकणाऱ्यांसाठी अनोखा उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

कर्जत नगर पंचायतचा अनोखा उपक्रम थुंकणाऱ्यांसाठी अनोखा उपक्रम

 कर्जत नगर पंचायतचा अनोखा उपक्रम थुंकणाऱ्यांसाठी अनोखा उपक्रम



नगरी दवंडी


कर्जत (प्रतिनिधी):-जागो जाग येथे थुंकू नका असे फलक आपण सातत्याने पाहतो व लोक ही त्यावरच थुंकून सूचनांची ऍसितैसी केलेली सर्वत्र पहायला मिळते त्यामुळे कर्जत नगर पंचायतने यावर नामी शक्कल लढवत थेट थुंकणार्यासाठी खास व्यवस्थाच केली असून येथे थुंकावे असा बोर्ड लावून अनोखा उपक्रम राबविला आहे. 

             कर्ज शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा या स्पर्धांमध्ये भाग घेतला कर्जत नगरपंचायत यासाठी विशेष प्रयत्न करत आहे त्यास नागरिकांची बहुमोल साथ मिळत असून कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी गेली 85 दिवसापासून श्रमदान करीत शहरातील स्वच्छता अभियान मोठ्या जोमाने उभारले आहे या माध्यमातून कर्जत शहर स्वच्छ होत असताना शहरात कोठेही लोकांनी थुंकू नये यासाठी आदेश काढण्याऐवजी कर्जत नगर पंचायतीने आपल्या कार्यालयात थुंकणाऱ्यांनी येथे थुंकावे असे बोर्ड लावत तीन ठिकाणी बेसिन उभारले आहेत या बेसिनमध्ये लोकांनी थुंकावे व तेथील नळाद्वारे पाणी सोडून पुन्हा स्वच्छता ठेवावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून इतरत्र थुंकल्यांवर मात्र एक हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचनाही यावर लावण्यात आलेल्या आहेत या अभिनव उपक्रमामुळे नगर पंचायतचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी बोलताना नागरिकांना येथे थुंकू नका असे आपण सांगत असतो मात्र अशा लोकांनी कोठे थुंकावे हा त्या व्यक्तीचा प्रश्न असू शकतो त्यामुळे मूळ समस्या दूर करण्यासाठी येथे थुंकावे ही व्यवस्था उभारली असून या पद्धतीने विविध शासकीय  कार्यालयात व्यवस्था झाल्यास लोकांमध्ये चांगली जागृती होऊ शकेल, कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता होत असताना या अभियानाला नागरिकांनी साथ देण्याची गरज आहे असे जाधव यांनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment