ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास गावकर्‍यांचे या दवाखान्यात होणार सवलतीत उपचार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास गावकर्‍यांचे या दवाखान्यात होणार सवलतीत उपचार

 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास गावकर्‍यांचे या दवाखान्यात होणार सवलतीत उपचार



नगरी दवंडी

     नगर - नगरमधील विविध गावांत होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणार्‍या गावकर्‍यांसाठी माळीवाडा येथील गोरे डेंटल हॉस्पिटलच्यावतीने दंत उपचारात 30 ते 50 टक्के सवलत देण्यात येईल, असे दंततज्ञ डॉ.सुदर्शन गोरे यांनी जाहीर केले.

विशेषत: नगर, पारनेर, कर्जत, राहुरी, पाथर्डी व नेवासा या तालुक्यातील विविध गावात बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी ही योजना लागू राहील. या सवलतीत दंतउपचार योजनेत फिक्स दात बसविणे, एका दिवसात रुट कॅनाल करणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, लहान मुलांचे रुट कॅनाल यासारख्या सर्व दंत उपचारांवर 30 ते 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.  बिनविरोध निवडणुका करणार्‍या गावांसाठी भविष्यात सुदृढ आरोग्य योजनेतंर्गत मोफत सर्वरोग निदान शिबीरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरे, व्यसनमुक्तता शिबीरे, यासारखी शिबीरे नगर डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून राबवणार असल्याचेही डॉ.सुदर्शन गोरे यांनी सांगितले.

 ग्रामपंचायत निवडणुकीत वेळ, पैसा, शक्ती व मनुष्यबळ यांचा विनाकारण अपव्यय होतो. सुदृढ लोकशाहीसाठी आणि विशेषत: तरुणाईला वाईट मार्गाला जाण्यापासून रोखण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात हा उद्देश या योजने मागील आहे.

No comments:

Post a Comment