अखिल भारतीय निबंध स्पर्धेत कु.महिमा अशोक दुसुंगे संपूर्ण भारतात दुसरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

अखिल भारतीय निबंध स्पर्धेत कु.महिमा अशोक दुसुंगे संपूर्ण भारतात दुसरी

 अखिल भारतीय निबंध स्पर्धेत कु.महिमा अशोक दुसुंगे संपूर्ण भारतात दुसरी .

आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनीचे यश .



नगरी दवंडी

नेवासा -

रोटरी क्लब आयोजित अखिल भारतीय निबंध स्पर्धेत  अहमदनगरच्या कु.महिमा अशोक दुसुंगे या विद्यार्थिनीने  संपूर्ण भारतात दुसरा नंबर पटकावून विजय संपादन केला.त्वचादान या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .

कुमारी महिमा अशोक दुसुंगे ही आठरे पाटील पब्लिक स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे . यावेळी शाळेचे संस्थापक डॉ अनिल आठरे तसेच शाळेच्या प्राध्यापकांनी  आणि विद्यार्थ्यांनी   शुभेच्छा देऊन तिचा सत्कार केला .

कु. महिमा ही  महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या  अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षा तसेच प्रदेश सदस्या सौ शिल्पाताई अशोकराव दुसुंगे यांच्या कन्या आहेत . परिसरातून तसेच जिह्यातून सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येत आहे .

No comments:

Post a Comment