शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे उत्स्फुर्त रक्तदान कौतुकास्पद : आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे उत्स्फुर्त रक्तदान कौतुकास्पद : आ. संग्राम जगताप

 शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे उत्स्फुर्त रक्तदान कौतुकास्पद : आ. संग्राम जगतापनगरी दवंडी


अहमदनगर : शिवप्रताप दिनाचे औचित्य साधुन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नगर विभागाने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांचा उत्स्फुर्तपणा कौतुकास्पद आहेच याच बरोबर रायगड येथे होणाऱ्या नियोजित ३२ मण सुवर्ण सिंहासनाच्या खडया पहाऱ्यासाठी देखील १३५ तरुणांनी आपल्या रक्ताच्या ठशांनी या उपक्रमासाठी केलेली नावनोंदणी गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन  आ. संग्राम जगताप यांनी केली. 

यावेळी आ जगताप म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्याचं दिवशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत त्याला यमसदनी धाडलं होतं. त्याचप्रमाणे आपण सर्वजण मिळुन या कोरोनारुपी अफजलखानाचाही असाचं नायनाट करु. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराने प्रेरीत झालेल्या या युवकांचे संघठन व त्यांचे सामाजिक कार्य इतरांना प्रेरणादायी आहे. 

यावेळी प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष देविदास मुदगल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या विचाराने प्रेरीत होऊन आम्ही सामाजिक कार्य सुरू ठेवलेले आहे. शहरातील महाराजांच्या पुतळ्याची आम्ही गेल्या १२ वर्षांपासून दररोज मनोभावे पुजा अर्चना करत आहोत. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला वारंवार रंग दिल्यामुळे त्याचा थर साचून त्यास भेगा पडत असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी या वेळी श्री मुदगल यांनी केली.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठाण नगर शहर प्रमुख देविदास(दादा) मुदगल, माजी नगरसेवक दत्तात्रय (तात्या) मुदगल, शिवाभाऊ वराडे, भुषण झारखंडे, तानाजी देवकर, बाली जोशी, अमर मुदगल, धीरज मुदगल, राकेश हुच्चे, मनिष आजबे, संदिप खामकर, महेश निकम, निलेश काटे, अभिजीत कांबळे, गणेश भोले, पवन आहेर व दिनेश जोशी, सागर ठोंबरे, दिनेश काते, अतुल गवळी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment