तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स चर्चमध्ये दिक्षा विधी संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स चर्चमध्ये दिक्षा विधी संपन्न

 तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स  चर्चमध्ये  दिक्षा विधी संपन्ननगरी दवंडी


नगर, दि.25(प्रतिनिधी) : तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स  चर्चमध्ये नुकताच धर्मगुरु (प्रिस्ट) या पदाचा दिक्षा विधी मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला. यावेळी ख्रिस्त बांधवांनी सोशल डिस्टसिंग पाळत कार्यक्रमाचा लाभ घेतला.

चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे पंचांगानुसार पवित्र आगमन समयामध्ये नाताळ सणाचे औचित्य साधून धर्मगुरु (प्रिस्ट) या पदाच्या दिक्षेचे आयोजन सेंट सेव्हिअर्स कॅथेडूल चर्चमध्ये करण्यात आले होते. बिशप ऑफ मराठवाडा तथा नाशिक धर्मप्रांताचे मॉडरेटर्स एपिस्कोपल कॉमीसरी रा.रेव्ह.एम.यु. कसाब यांच्या हस्ते डिकन रवि चांदेकर ,डिकन सतिश तोरणे व डिकन अमोल तोरडे यांना रेव्हरंड पदाची दिक्षा देण्यात आली.

दिक्षा विधी करिता पुणे धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. पॉल दुपारे यांनी प्रवचनातून दिक्षार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, चर्च ऑफ नार्थ इंडियाला दिक्षा विधीचा हा ऐतिहासिक वारसा आहे. नाशिक धर्मप्रांताचे सेंट सेव्हिअर्स कॅथेडूल हया ठिकाणी बिशपांच्या गादीचा वारसा आहे. तसेच दिक्षार्थींच्या हाती सोपविला जाणारा खजिना म्हणजे ख्रिस्ताचा कळप अर्थात खरिस्तमंडळी होय, ह्या मंडळीचे दिक्षार्थी मेंढपाळ झालेले असून ह्या मंडळीची म्हणजे समाजातील दिन दुबळे, गरजवंत, निराश्रित ह्यांची सेवा करावयाची आहे, जन सेवा हिच खरी ईश्‍वरसेवा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

या दिक्षाविधीचे आयोजन चर्चचे प्रिस्ट इन चार्ज रेव्ह.डि.डि. सोनावणे यांनी केले होते. सदर दिक्षा विधी करिता नाशिक धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रे. अनंत आपटे, धर्मप्रांताचे सचिव रेव्ह. संदिप वाघमारे तसेच नाशिक व अहमदनगर जिल्हयामधील आचार्य व कार्यकारिणी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच दिक्षा विधीचे सर्व नियोजन चर्चचे सचिव प्रशांत सुरेश पगारे, खजिनदार, श्रीमती मायाताई जाधव, पास्टोरेट कमिटी मेंबर किरण चार्लस मते, जेम्स पटेकर, लाजरस पवार, सरोज साळवे,  सिसिल भकत, श्री. राहुल पाटोळे, लाजरस पवार, शैलाताई कांबळे, मिस. व्हिकटोरिया मते, निर्मला साठे यांचा सहभाग लाभला.

No comments:

Post a Comment