अपघात ग्रस्ताच्या मदतीस धावले माजी आमदार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

अपघात ग्रस्ताच्या मदतीस धावले माजी आमदार

 अपघात ग्रस्ताच्या मदतीस धावले माजी आमदारनगरी दवंडी


आष्टी (प्रतिनिधी):आष्टी तालुक्यातील पांढरी जवळील अपघात जखमी झालेल्या महादेव सांगळे राहणार करेवाडी यास माजी आमदार धोंडे यांनी मदत केली जखमी झालेला सांगळे या स्वतःच्या वाहनातून सरकारी दवाखान्यात पोहोच करून नातेवाईक येईपर्यंत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी वेळेत उपचार मिळवून दिले आहे. माजी आमदार भीमराव धोंडे बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बीड हुन आष्टी कडे येत असताना त्यांना पांढरी जवळ मोटरसायकलवर महादेव सांगळे हे जखमी व बेशुद्ध दिसले गाडी थांबून थांबून त्याला आष्टीला आणले. अपघातात मोटारसायकल वर जखमी झाले होते. जखमी व्यक्ती दिसताक्षणी धोंडे यांनी गाडी थांबवून त्या व्यक्तीला स्वतःच्या वाहनातून शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले व्यक्तीचे नातेवाईक येईपर्यंत स्वतः दवाखान्यात थांबून त्या बेशुद्ध सांगळे यांना वेळेत उपचार मिळवून दिले सांगली कुटुंबियांना माजी आमदार भीमराव धोंडे यांचे आभार मानले

No comments:

Post a Comment