या परिसरात बिबट्याने पाडला शेळी व घोड्याचा फडशा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

या परिसरात बिबट्याने पाडला शेळी व घोड्याचा फडशा

 या परिसरात बिबट्याने पाडला शेळी व घोड्याचा फडशा



नगरी दवंडी


माका प्रतिनिधी_नेवासे तालुक्यातील माका तसेच पाचुंदे म.ल.हिवरे,आडगाव तसेच इतर परिसर शेजारच्या गावात बिबट्याच्या वावरामुळे घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे.याअगोदर बिबट्या,वाघ रानातीलच रानडुकरे,मोर,कुत्रे,या प्राण्यांवरती उपजीविका भागवत असे,पण आता ही संपल्यानंतर अलीकडे याने आपला मोर्चा शेतातील वस्तींकडे वळविला आहे.यामुळे हा कार्यक्रम दैनंदिन असल्याने,वस्ती करून रहाणारा शेतकरी मात्र पुर्णत:घाबरून गेला आहे.याबाबत आजरोजी पहाटेच्या 2ते 3 वा.सुमारास बिबट्याने अतिष आबासाहेब क्षेत्रे यांच्या राहत्या वस्तीवरील दोन शेळ्यांचा फाडशा पाडला.परवा च्याला पाचुंदे शिवारात शेतात बसुन मेंढरे चारण्यासाठी असलेल्या मेंढपाळाच्या घोड्याचे पिल्लु बिबट्याने खाल्ले.बिबट्याच्या दहशतीची चपराक प्रामुख्याने शेतात काम करणारे,रात्रीअपरात्री पिकास पाणी देण्यासाठी जा_ये करणारे,तसेच शेतात वस्ती करून रहाणारयां शेतकरी वर्गास सध्यातरी चांगलीच बसली आहे.याबाबतीत माहिती मिळताच क्षेत्रे यांच्या वस्तीवरती,वन विभागाचे वनरक्षक चंद्रकांत गाढे,वन कर्मचारी मोरे घटनास्थळी दाखल झाले.पहाणी करून पंचनामा केल्याची माहिती वनविभागाचे सयाजी मोरे यांनी दिली.यावेळी क्षेत्रे यांचे सहकारी,शेजारच्या शेतातील शेतकरी,उपस्थित होते.यामुळे सध्यातरी तालुक्यातच नव्हे तर सगळीकडेच बिबट्याचीच हवा असल्याचे पहावयास मिळत आहे.

No comments:

Post a Comment