शहरामध्ये पहिल्या नायट्रोजन एअर सेंटरचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

शहरामध्ये पहिल्या नायट्रोजन एअर सेंटरचे उद्घाटन

 शहरामध्ये पहिल्या नायट्रोजन एअर सेंटरचे उद्घाटन


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः  नगर शहरामध्ये पहिल्या नायट्रोजन एअर सेंटरचे उद्घाटन नुकतेच भारत पेट्रोलियम टेरटी मॅनेजर दिनेश गाडगीळ आणि असिस्टंट मॅनजेर सेल विभागाचे प्रतिक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
    शहरातील पहिल्या नायट्रोजन एअर सेंटरची सुरुवात दीपक पेट्रोल पंप येथे करण्यात आली आहे. वाहनांच्या टायर्स मध्ये भरल्या जाणार्या हवेच्या तुलनेत नायट्रोजन हवा ही उत्तम असल्याचे वाहन संशोधनात समोर आले असल्याने जिल्हयात पहिल्यांदाच हा प्रयो राबवण्यात येत असल्याने यावेळी गाडगीळ यांनी म्हंटले आहे.
तसेच पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, शहरातील वाहनचालकांना आता या सेवेचे लाभ घेता येणार आहे. नागरीकांसाठी  नगर-मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन शेजारील दीपक पेट्रोल पंप या ठिकाणी या नायट्रोजन ए अर ची सुरुवात झाली करण्यात आली आहे. टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली असून याचा नागरीकांनी उपयोग करुन घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
    यावेळी दीपक पेट्रोल पंप येथे टू व्हीलर मध्ये चारशे रुपयांचे पेट्रोल भरणार्या व  फोरव्हिलरमध्ये अडीच ते तीन हजार रुपयांचे डिझेल भरणार्या वाहनचालकांना ही नायट्रोजन एअरची सेवा मोफत दिली जाणार असल्याचेही यावेळी दीपक पेट्रोलचे संचालक अनिल जोशी यांनी म्हंटले आहे. 

No comments:

Post a Comment