आता कुठल्याही ठिकाणावरुन करता येणार मतदान.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

आता कुठल्याही ठिकाणावरुन करता येणार मतदान..

 नव्या युगाचे नवे ई.व्हीएम

आता  कुठल्याही ठिकाणावरुन करता येणार मतदान..

लवकरच भारतीय नागरिक देशाच्या कुठल्याही भागात प्रवास करत असताना स्वतःच्या मतदारसंघातील पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकणार आहे. ईव्हीएमला याकरता कशाप्रकारे सक्षम करण्यात यावे यासंबंधी निवडणूक आयोगाकडून विचारविनिमय सुरू आहे. विशिष्ट ईव्हीएममध्ये अशी डायनॅमिक यादी असेल, ज्याद्वारे कुठलाही मतदार स्वतःचे गृह राज्य, विधानसभा मतदारसंघ शोधून स्वतःच्या पसंतीचा उमेदवाराला मतदान करू शकणार आहे. आयोगात सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अन्य तांत्रिक, व्यवहार्य आणि कायदेशीर पैलूंवर मंथन सुरू आहे.

     सद्यकाळात कुठल्याही ईव्हीएमच्या बॅलेट युनिटमध्ये जेथे वापर होत आहे, अशा संबंधित भागातील उमेदवारांची यादी असते. तर डायनॅमिक ईवहीएमध्ये डाटा राखून ठेवण्याची जबरदस्त क्षमता असणार आहे. दिल्लीत असलेले प्रवासी मतदार बिहारच्या मधेपुरा, केरळच्या पलक्कड किंवा उत्तराखंडच्या केदारनाथमधील स्वतःच्या  मतदारसंघाचा शोध घेऊन स्वतःच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकणार आहे. याकरता केवळ तेथील मतदारयादीत नाव समाविष्ट असणे आवश्यक असून त्यानुरुप मतदार ओळखपत्रही गरजेचे आहे. वर्तमान काळात कुठल्याही व्यक्तीला मतदान करण्यासाठी स्वतःच्या मतदान केंद्रावर जावे लागते.  परंतु निवडणूक आयोगाकडून नवी कल्पना साकारण्यात आल्यास 10 हजार अशा डायनॅमिक ईव्हीएमद्वारे हे क्रांतिकारक परिवर्तन घडविले जाऊ शकते. कारण प्रत्येक जिल्हयात असे 5-6 ईव्हीएम दुर्गम आणि शहरी भागांमध्ये तैनात केल्यास आणि मोठया शहरांमध्ये त्याच प्रमाणात त्यांची संख्या वाढविल्यास चित्रच बदलणार आहे. महानगरांमध्ये स्थलांतरितांची संख्या अधिक असते, अशा स्थितीत तेथे डायनॅमिक ईव्हीएम तैनात केल्यास उद्देशपूर्ती होऊ शकते.
      सर्वकाही योजनेनुरुप पार पडल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या तंत्रज्ञानाद्वारे क्रांतिकारक बदल देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात नवी गाथा रचणार आहे. मतदार देशात कुठूनही स्वतःच्या मतदारसंघाकरता मतदान करू शकणार आहे. या प्रकल्पावर मागील 9 महिन्यांपासून जोरदार काम सुरू आहे.  तांत्रिक प्राविण्य प्राप्त असलेले दिग्गज आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्यूटिंगचे महासंचालक रजत मूना, आयआयटी मद्रास, दिल्ली आणि पवईच्या तज्ञांचे 7 सदस्यीय पथक रिमोट व्होटिंग प्रेमवर्कवर सातत्याने संशोदान करत आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी डायनॅमिक ईव्हीएमच्या प्रोटोटाइपच्या प्रदर्शनाद्वारे होऊ शकते. म्हणजेच 2021 हे वर्ष अनेक सुखद, क्रांतिकारक आणि दिलासा देणारे गोष्टी आणणारे ठरणार आहे. पुढील वर्षी केवळ कोरोना विषाणूला निष्प्रभ करणारी लसच नव्हे तर आणखी काही चमत्कारिक गोष्टी गवसणार आहेत.

No comments:

Post a Comment