या चौकात हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 16, 2020

या चौकात हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा

 या चौकात हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा

दोन  पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका व  दोनआरोपी ताब्यात घेतले.
नगरी दवंडी


अहमदनगर - आज दि.  16/ 12/2020 रोजी मा पोलीस अधीक्षक मनोज पाटील सो अहमदनगर यांना  बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंग  येथे मालक  नामे प्रवीण बाळासाहेब पानसंबळ  हा   महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे    मा.श्री. मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा.  डॉक्टर दिपाली काळे  अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर याचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे Dy.s.pसंदिप मिटके   Dy.s.p  संजय सातव, श्री नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर शहर , श्री अभिनव त्यागी, स.पो.नि. समाधान पाटील व कर्मचारी यांचे पथक तयार करुन हॉटेल  यमुना लॉजिंग येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी क्रं,1) प्रवीण बाळासाहेब पानसंबळ   रा निर्मळ पिंपरी ता राहता 2) अरबाज मोहमद शेख रा बाभलेश्र्वर यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द  लोणी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे भा. द. वि. कलम 370 सह  स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अप्पर पोलीस अधीक्षक   डॉक्टर दिपाली काळे  यांच्या  मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके, श्रीरामपूर शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी  संजय सातव आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी, अभिनव त्यागी  लोणी पोलीस ठाण्याचे समाधान पाटील यांच्या पथका ने  ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here