तालुक्यात या ठिकाणी जुगार अड्डयावर कारवाई, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 16, 2020

तालुक्यात या ठिकाणी जुगार अड्डयावर कारवाई, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

 तालुक्यात या ठिकाणी जुगार अड्डयावर कारवाई,  13 लाखांचा मुद्देमाल जप्त

विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाचा छापानगरी दवंडी


नगर : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी नियुक्त केलेल्या पथकाने नगर तालुक्यातील जेऊर  शिवारात जुगार अड्डयावर मोठी कारवाई करीत 17 जणांना ताब्यात घेतले आहे. यात नगरमधील व्यापार्‍यांसह श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा, शेवगाव येथील जुगार्‍यांचा समावेश आहे. जेऊर शिवारात चाफेवाडी रोडलगत अंबादास म्हस्के यांच्या मालकीच्या शेतात झाडाखाली हा जुगार अड्डा चालू होता. दि.17 रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात जुगार्‍यांकडून 2 लाख 68 हजार 360 रुपयांची रोख रक्कम, आठ लाख रुपये किंमतीच्या चार चाकी, 2 लाख 30 हजारांच्या मोटारसायकली, 2550 रुपयाचे जुगाराचे साहित्य असा एकूण 13 लाख 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जुगार खेळणार्‍यांमध्ये विजय चांदमल मुनोत (रा.विनायकनगर, नगर), मुकेश नथ्थुराम मनोदिया, महेश भगवान साळवे, प्रतिक दादासाहेब हिवाळे, शौकत दिलावर शेख, अय्युब अब्बास शेख, जमिर निजाम शेख, अविनाश बाळासाहेब तोडमल, मधुकर नाथाजी मोहिते, प्रणव सुनिल पंचमुख, दत्तात्रय रामदास गवळी, समिर जाकीर शेख, अझरूद्दीन चांद तांबोळी, अश्पाक कय्यूम शेख, दीपक देविदास पवार, मतिन खलीद सय्यद यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here