स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये पंचतारांकीत मानांकन मिळवण्याचा संकल्प - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये पंचतारांकीत मानांकन मिळवण्याचा संकल्प

 स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये पंचतारांकीत मानांकन मिळवण्याचा संकल्प 



नगरी दवंडी

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व राज्य शासनाच्या वसुंधरा अभियानामध्ये भाग घेतलेला आहे. गतवर्षी लोकसहभागामुळे आपण उत्तम कामगिरी केली आहे. थ्री स्टार मानांकन मिळवले,  स्वच्छतेच्या बाबतीत देशात ४० व्या स्थानावर पोहोचलो ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. यापुढे जाऊन या वर्षी आपण आणखी प्रयत्न करून आपल्या शहराला पंचतारांकीत मानांकन मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले.

याबाबत मनपा खाते प्रमुखांची नियोजन व आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यात सर्वांना जबाबदारी देण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चे प्रकल्प अधिकारी राहूल अहिरे व सौरभ जाधव यांनी याबाबत सादरीकरण केले. मानांकनासाठी असलेले विषय सर्वांना विभागून देण्यात आले असून प्रत्येकाने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडावी, जनजागृती तसेच प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे असे आवाहन श्री मायकलवार यांनी यावेळी केले. यावेळी

 उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे,   संतोष लांडगे, सहा. आयुक्त श्री राऊत, परिमल निकम, राम चारठाणकर, प्रवीण मानकर, रोहीदास सातपूते, डॉ. अनिल बोरगे, डॉ. नरसिंह पैठणकर, अभियानाचे शहर समन्वय लक्ष्मण लांडगे, मेहेर लहारे, अशोक साबळे, वैभव जोशी, श्री तडवी, श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, प्रभाग अधिकारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment