मतदानाच्या हाव्यासापोटी स्थनिक लोकप्रतिनिधींनी बोगस नाव नोंदनी केल्याचा मनसेचा आरोप .... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

मतदानाच्या हाव्यासापोटी स्थनिक लोकप्रतिनिधींनी बोगस नाव नोंदनी केल्याचा मनसेचा आरोप ....

 मतदानाच्या हाव्यासापोटी स्थनिक लोकप्रतिनिधींनी बोगस नाव नोंदनी केल्याचा मनसेचा आरोप ....



नगरी दवंडी


            पारनेर प्रतिनिधी

   पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत हद्दीत मध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे ९१ परदेशी व परप्रांतिय  नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. सदर मतदार हे मोकळ्या जागेत झोपडपट्टी बांधुन रहात असुन त्याचे दर सहा महिन्यांनी स्थलांतर होत असते. त्यांना राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे बोगस आधार कार्ड व रेशन कार्ड मिळालेले असुन त्या आधारावर सुपा-वाळवणे रस्त्यालगत गट नंबर ४२ मध्ये कच्या स्वरूपाची पाल तंबू असा निवारा करुण रहात आहेत. कुठल्याही ठोस पुरावा नसतांना केवळ निवडणुकीत मतदानाच्या हाव्यासापोटी हि नावे घेतली असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

        या बाबत ग्रामविकास अधिकारी यांनी सुद्धा पहाणी करून अहवाल सादर केला आहे तसेच याबाबत सदर बोगस नावे असल्याचे निष्पन्न झाले असा अहवाल पंचायत समिती सभापती यांना दिला होता. तरीसुद्धा ही नावे वगळण्यात आली नसुन नविन मतदार नोंदणी करता १५ वर्ष रहिवासी पुरावा ग्राह्य धरला जातो तसा पुरावा ही सदर नाव नोंदणीत नाही हे माहीती अधिकारत सिध्द झाले. तरीदेखील कुठल्या आधारावर ही नाव नोंदणी झाली या करता अनेक राजकीय सामाजिक संघटनानी तहसीलदारांना निवेदने दिली तरीही ही नावे मतदान यादीतून वगळले नाहीत. तहसीलदार स्थानिक आमदाराच्या दबावाखालती काम करत असुन स्थानिक आमदार  व सरपंच यांनी त्यांचे मतदान घडवून आनण्याकरता या बांग्लादेशी लोकांचा वापर करत आहे. हा महाराष्ट्र नवनिर्मानसेनेचा आरोप असुन पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत हद्दीत  यादी भाग नंबर २६७ व २६८ मध्ये आलेली ९१ बोगस नावे रद्द  आणि तसेच या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या बोगस नावे असणार्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये अशी मागणी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांना मनसेच्या वतीने करण्यात आली.

       अन्यथा महाराष्ट्र नवनिर्मानसेना आपल्या दालनात आंदोलन करेल याची आपण नोंद घ्यावी असा  ईशारा मनसेच्या वतीने सहकार सेना सरचिटणीस अनिल चितळे, प्रदेश उपाध्यक्ष डी. एन. साबळे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, मनसे तालुका उपाध्यक्ष  अविनाश पवार, सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, उपजिल्हाध्यक्ष मारुती रोहकले यांनी दिला आहे. 

      दरम्यान मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देताच जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांनी  ताबडतोप या प्रकरणात लक्ष्य घालुन चौकशी करण्याचे अश्वासन दिले आहे.

No comments:

Post a Comment