ख्रिस्ती सेनेचे रामवाडीतील शाखेचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

ख्रिस्ती सेनेचे रामवाडीतील शाखेचे उद्घाटन

 ख्रिस्ती सेनेचे रामवाडीतील शाखेचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  भारतामध्ये विविध राज्यांमध्ये ख्रिस्ती सेनेचे काम कार्यरत सुरु आहे. चार राज्यांमध्ये त्यांचं काम सुरु असुन आता महाराष्ट्रात देखील त्यांनी आता संघटना उभी करून काम सुरू करण्यात आले आहे. या सेनेची शाखा रामवाडी भागात करण्यात आली असून त्याचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी जगताप यांनी नुतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ख्रिस्त सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष नितीन खंडागळे, संस्थापक दिपक खंडागळे, शाखा अध्यक्ष सागर कोल्हे, शाखाउपाध्यक्ष व्किटर साळवे, सचिव विशाल पाटोळे, खजिनदार दिपक कांबळे, सल्लागार संदिप गायकवाड, संघटक शुभम कोल्हे आदीसह नितीन साळवे, सतिष साळवे, प्रकाश वाघमारे, सुरेश वैरागळ, पप्पु पाटील, पिटर साळवे, अमोल साळवे, सुरेश दौंडे, राम ससाणे, फारुकभाई कपाटवाले, मंगेश शिंदे, कैलास जावेद, राजू गायकवाड, साहिल साळवे, अजय गायकवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जगताप म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये ही ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला हे काम सुरू केला असुन पुढील काळात संघटन करुन सर्वांना बरोबर घेऊन सर्वांनी समाज उपयोगी काम करावे. संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लावावेत महाराष्ट्रात प्रमाणे नगर जिल्ह्यात व तालुका स्तरावर सेनेचे काम पोहोचावे समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या ख्रिस्ती सेनेच्या  संघटनेच्या माध्यमातून व्हावे, असे आमदार जगताप म्हणाले.

No comments:

Post a Comment