बोल्हाईमाता मंदिराच्या जिर्णोध्दाराला प्रारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

बोल्हाईमाता मंदिराच्या जिर्णोध्दाराला प्रारंभ

 बोल्हाईमाता मंदिराच्या जिर्णोध्दाराला प्रारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  केडगावच्या  विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही . केडगावचा रचनात्मक विकास करण्यासाठी कटिबध्द असुन त्यासाठी नियोजनबध्द विकासकामे हाती घेण्यात येत असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली .
केडगाव येथील नविन गावठाण परिसरात असणार्‍या बोल्हाईमाता मंदिराच्या जिर्णोध्दर कामाचे भुमिपुजन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, माजी सरपंच रामदास येवले, केडगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष अंजाबापु सातपुते , रावसाहेब सातपुते , अनिल ठुबे , शशिकांत आठरे, जयद्रथ खाकाळ आदि उपस्थीत होते.
यावेळी जगताप म्हणाले की ,केडगाव येथे असणार्‍या बोल्हाई माता मंदिराच्या विकास कामाला भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे . याठिकाणी होणार्‍या सांस्कृतीक सभागृहाचा उपयोग गोरगरिबांच्या कार्यक्रमासाठी व धार्मिक कार्यासाठी होणार असल्याने हे मंदिर केडगावच्या विकासाचा मानबिंदू ठरणार आहे. यावेळी बाबासाहेब कोतकर, जालिंदर कोतकर, बच्चन कोतकर, अनिल आंधळे, रामदास महाराज क्षिरसागर, रमेश परतानी, राजेंद्र पवार, आसाराम जगदाळे आदि उपस्थीत होते. माजी सरपंच प्रभाकर गुंड यांनी उपस्थीतांचे स्वागत केले.

No comments:

Post a Comment