भिंगारला आरपीआयच्या सभासद नोंदणींचा प्रारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

भिंगारला आरपीआयच्या सभासद नोंदणींचा प्रारंभ

 भिंगारला आरपीआयच्या सभासद नोंदणींचा प्रारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. युवक शहराध्यक्ष अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली भिंगारमध्ये पाचशे सभासदांची नोंदणी करुन वंचित बहुजन आघाडीचे युवक शहराध्यक्ष विशाल साबळे, अनिकेत मोहिते, शिव भोसले, संदीप ससाणे, नागेश साठे यांचासह दोनशे युवकांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला.
आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिंगार येथील इंदिरानगर परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी भगवान गौतम बुध्द, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, युवक शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक राहुल कांबळे, आय.टी. सेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, धम्ममित्र दिपक अमृत, दिपक गायकवाड, महादेव भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, शफीक मोघल, संतोष सारसर, दया गजभिये, हर्षल कांबळे, लखन आढाव, गौतम कांबळे, शुभम ससाणे आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरपीआय मध्ये प्रवेश करणार्या व सभासद झालेल्या युवकांचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment