कृषी कायद्यात विरोध फक्त पंजाब हरियाणा मधूनच- पाशा पटेल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

कृषी कायद्यात विरोध फक्त पंजाब हरियाणा मधूनच- पाशा पटेल

 कृषी कायद्यात विरोध फक्त पंजाब हरियाणा मधूनच- पाशा पटेल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पंजाब व हरियाणा सोडले तर देशभरात कृषी कायद्याला कुठेही विरोध नाही.  प्रातिनिधिक आंदोलने सोडली तर आंदोलनाला जनाधार कुठेही नाही.  आंदोलनाला कुठेही जन सममर्थन नाही. दिल्लीत आंदोलन करणारे फक्त आधारभूत किमतीची मागणी करण्यासाठी आले होते. नंतर त्यात राजकारण घुसले. कृषी कायद्यामुळे शेतकर्‍यांचे भलेच होणार आहे. स्पर्धा निर्माण होणार असल्याने पिकाला भाव मिळणार आहे, असं मत केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी व्यक्त केलं. हॉटेल पॅराडाईज मध्ये त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मात्र कृषी कायद्यावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना ते गैरहजर का होते ?  पवार हे कृषिमंत्री असतानाच कृषी कायद्याचा मसुदा तयार झाला. त्यामुळे त्यांचा विरोध कायद्याला नव्हे तर सिस्टिमला आहे, अशी टीका ही पाशा पटेल यांनी केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा शेतकरी हा आत्मा आहे, असे सांगितले जाते.

No comments:

Post a Comment