कोरोना संकट काळातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील : आयुक्त मायकलवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

कोरोना संकट काळातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील : आयुक्त मायकलवार

 कोरोना संकट काळातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील : आयुक्त मायकलवार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मार्च महिन्यात आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा कोरोनाचं मोठं आव्हान माझ्यासमोर होते.. कोरोनाविषाणू बाबत भीतीचं वातावरण होतं.. त्यासाठी जास्तीत जास्त कोविड सेंटर सुरू करण्याचा मी प्रयत्न केला. शहराची मला माहिती नव्हती. कर्मचारीही ओळखीचे नव्हते. कुटुंबात अप्रिय घटना घडत तरी मी राजा घेतली नाही. कोरोना संकट काळातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील. अस प्रतिपादन मावळते आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांनी सेवानिवृत्तीनिमित्त मनोगत व्यक्त करताना केले.
कोरोना बाधीत रुग्णाजवळ जाण्यास नातेवाईक देखील घाबरत होते. विषाणूबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आयुक्त म्हणून रुजू झालो त्यावेळी सर्व परिस्थिती नवीन होती. तरीही आम्ही सर्व अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी एकजुटीने परिस्थितीला दृढ निश्चयाने सामोरे गेलो. दैनंदीन स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती आदी नित्य व अत्यावश्यक सेवा अखंडपणे सुरू ठेवली असेही ते म्हणाले.
श्री. मायकलवार पुढे म्हणाले की, कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कठोर पाऊले उचलत टाळेबंदी घोषीत केली होती व दररोज वेगवेगळे निर्देश जारी केले जात होते. त्या सर्व निर्देशांची आम्ही सर्वांच्या सहकार्याने प्रभावीपणे अंमलबजावणी केली. कोरोना संसर्ग रोखण्यात व रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन त्यात नगरकरांची साथ लाभल्याने यश मिळवले. याच दरम्यान उपजीवीका व रोजगारासाठी मोठया शहरांत गेलेल्या नागरिकांनी आपापल्या गावी परतीचा प्रवास सुरू केला. अनेक गोरगरिबांनी अक्षरशः पायपीट  सुरु केली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने या सर्वांची व्यवस्था महानगरपालिकेने केली. दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने किचन सुरू करून दररोज सुमारे एक हजार नागरिकांच्या भोजनाची सुविधा सलग पाच महिने उपलब्ध करुन दिली, यात मोठे समाधान मिळाले.
कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारांसाठी कोविड सेंटर सुरू करून त्यांना दिलासा देण्याचे काम केले. अशा कठीण काळात कर्तव्य बजावत असतांना कुटुंबात अप्रिय घटना घडली तरीही कधी रजेवर गेलो नाही. नागरिकांना प्राधान्याने सेवा देण्याचा प्रयत्न केला. याच बरोबर आता हळूहळू टाळेबंदी शिथील झाल्यानंतर शहरातील महत्वाच्या योजनांच्या कामांना गती देण्याचे काम केले. अमृत पाणी योजना आता अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पुर्ण होऊन शहराला पुर्ण दाबाने पाणी पुरवठा होईल.

No comments:

Post a Comment