नाशिक परिक्षेत्रात 133 लाचखोर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

नाशिक परिक्षेत्रात 133 लाचखोर.

 नाशिक परिक्षेत्रात 133 लाचखोर.

अहमदनगर एसीबीकडून सर्वाधिक 32 सापळे.

26 महसूल, 24 पोलीस लाच खोर

104 पैकी 48 गुन्हे तपास प्रलंबित.


नाशिक :
सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची विविध कामांसाठी अडवणूक करत लोकसेवकांकडून सर्रासपणे लाच मागण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले दिसून येत नाही. उत्तर महाराष्ट्रात या वर्षभरात तब्बल 133 लाचखोर लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. सर्वाधिक 32 सापळे अहमदनगर जिल्ह्यात तर त्यापाठोपाठ नाशिकमध्ये 27 सापळे विभागाने यशस्वीरित्या रचले आहेत.
यावर्षी मार्च महिन्यापासूनच कोविड-19 अर्थात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झाल्याने शासकीय कामकाजही मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाले होते. शासकिय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचार्‍यांची संख्याही रोडावली होती, तरीदेखील या वर्षभरात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव अशा पाच जिल्ह्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  नाशिक परिक्षेत्रात एकुण 100 लोकसेवक रंगेहाथ लाच घेताना पकडले गेले. यामध्ये सर्वाधिक पोलीस आणि महसुल खात्याच्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये वर्षभरात नऊ लाचखोर पोलीसांसह महसुल खात्याच्या सात कर्मचार्‍यांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. तसेच अहमदनगरमध्येसुध्दा आठ पोलीस आणि नऊ महसुल कर्मचारी लाचेची रक्कम घेताना सापळ्यात अडकले. नाशिक परिक्षेत्रात एकुण 26 लाचखोर महसुल कर्मचारी आणि 24 पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक परिक्षेत्रात चालु वर्षभरात शंभर सापळे यशस्वी ठरले तर अपसंपदेप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. या विभागात एकुण 104 गुन्हे यावर्षी दाखल झाले. लॉकडाऊन शिथिल होताच शासकिय कार्यालयांमधील कामकाजाची गाडी रुळावर आली आणि काही लोकसेवकांनी भ्रष्टाचाराकडे वळत लाचेची मागणी करत सर्वसामान्यांची अडवणूक केल्याचे दिसुन आले. सर्वाधिक गुन्हे लॉकडाऊन शिथिलतेनंतर घडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नाशिक परिक्षेत्रात दाखल झालेल्या 104गुन्हयांपैकी 48 गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे तर 12 गुन्ह्यांत विभागाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहेत.
यावर्षी कोरोनामुळे करण्यात आलेला लॉकडाऊनचा परिणाम भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर झालेला दिसतो. तरीही शंभर सापळे यशस्वी झाले. यावर्षी नाशिक युनीटने कृषी खात्यातील वर्ग-1, प्रदूषण मंडळातील वर्ग-1व2, गृह खात्याशी संबंधित वर्ग-1च्या अधिकार्‍यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. कोविड-19चे आव्हान पेलत विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपली जबाबदारी पार पाडली. परिक्षेत्रातील एकुण 16 अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधाही झाली होती. राज्यात नाशिकचा भ्रष्टाचारविरोधी कारवाईत दुसरा क्रमांक लागला आहे.

No comments:

Post a Comment