बाळ बोठेंच्या अडचणीत वाढ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 16, 2020

बाळ बोठेंच्या अडचणीत वाढ.

 बाळ बोठेंच्या अडचणीत वाढ. 

पोलीस प्रशासन या प्रमुख आरोपीला कोठे शोधणार ? आत्मसमर्पण कि उच्च न्यायालयात अपील ?

जामीन ना मंजूर!



अहमदनगर :- संपूर्ण जिल्ह्याचंच नव्हे तर राज्यातील प्रसिद्धी माध्यमांचं लक्ष लागलेल्या सर्वात चर्चित अशा रेखा जरे हत्या प्रकरणातील संशयित प्रमुख मास्टरमाईंड पत्रकार बाळ बोठे यांचा अटकपूर्व जामीन आज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे बोठे हे एकतर पोलीस प्रशासनापुढे आत्मपरीक्षण करतील की उच्च न्यायालयात अपील करतील हे येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होणार आहे.

   बोठे यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद काल पूर्ण झाला. आरोपींच्या वकिलांनी बोठे यांना जामीन मिळावा यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण ते बोठे यांना अटकपूर्व जामीन मिळू शकले नाहीत. अनेक दिवस राज्यात व जिल्ह्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा न्यायालयात झाली. हनी ट्रॅप च्या सकाळ’मधील वृत्त मालिकांमुळे चर्चीत आलेले बोठे हनी ट्रॅप मुळेच खुनासारख्या गुन्ह्यात अडकले व हनी ट्रॅप च्या वृत्तपत्रातील मालिकेत सागर भिंगारदिवेंचे नाव आल्यामुळे भिंगारदिवे यांने रागातून बोठेंचं नाव घेतले हा आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयासमोर टिकू शकला नाही हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे.

    आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पोलिस यंत्रणा बोठे यांना कसं गजाआड करणार ? बोठें बाबत ते कुठे आहेत याची माहिती पोलीस प्रशासनाकडे नसेल तर मग पोलीस यंत्रणेचा तपास आता कोणत्या दिशेने जाणार ? बोठे सापडतील की फरारच राहतील याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीच या खूनप्रकरणी आरोपी फिरोज राजू शेख (वय 26 रा.संक्रापूर आंबी ता. राहुरी), ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (वय 24,रा. कडीत फत्तेबाद ता.श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (वय 25,रा.तिसगाव फाटा कोल्हार ता.राहता), सागर उत्तम भिंगारदिवे (वय 31, रा. शास्त्रीनगर केडगाव अहमदनगर),ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार (वय 23,रा.प्रवरानगर ता.राहाता) आदी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात निष्पन्न झाल्यापासून बाळासाहेब बोठे हा फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे व दुसरा आरोपी सागर भिंगारदिवे एकमेकांच्या संपर्कात होते. घटनेच्या दिवशी आणि त्याआधीही ते एकमेकांच्या संपर्कात आल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असा दावा सरकार पक्षातर्फे कोर्टात करण्यात आला होता. तर आरोपीतर्फे अ‍ॅड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी बाळ बोठे याने तो काम करत असलेल्या वृत्तपत्रात ‘हनी ट्रॅप’संबंधी वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यामध्ये एका भागात यातील आरोपी सागर भिंगारदिवे याच्याबद्दल लिहिले होते. त्याचे उद्योग उघडकीस आल्याने त्या रागातून त्याने या गुन्ह्यात बोठेचे नाव घेतले आहे. याशिवाय दुसरा पुरावा आणि ठोस कारण पोलिसांकडे नाही, असे महेश तवले यांनी सांगितले.  यासर्व  युक्तिवादानंतर अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयचे न्यायाधीश एम. आर. नातू यांनी हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच जमीन अर्ज फेटाळला आहे.

जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी  युक्तिवादात काय म्हणाले होते , या हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हनी ट्रॅपचेच कारण आहे का हेही अद्याप पुढे आलेले नाही. केवळ भिंगारदिवे याने नाव घेतले म्हणून बोठेला आरोपी करण्यात आले नाही. पोलिसांना तसे सबळ पुरावे मिळालेले आहेत. भिंगारदिवे आणि बोठे यांच्यात वितुष्ट होते तर ते एकमेकांच्या संपर्कात कसे होते. 24 नोव्हेंबर व घटना घडली त्या 30 नोव्हेंबर या दिवशी या दोघांत मोबाइलवरून वेळोवेळी संभाषण झाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. याशिवाय जरे यांच्या घराच्या झडतीत त्यांच्याच हस्ताक्षरातील एक पत्र मिळाले असून, त्यात आरोपीपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे लिहिलेले आहे. या सर्व पुराव्यांची पडताळणी करायची आहे. त्यासाठी आरोपीची अटक आवश्यक असल्याचे पाटील यांनी कोर्टात सांगितले.


आरोपीचे वकिल यांचा युक्तिवाद -

त्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी बाळ बोठे याने तो काम करत असलेल्या वृत्तपत्रात ‘हनी ट्रॅप’संबंधी वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यामध्ये एका भागात यातील आरोपी सागर भिंगारदिवे याच्याबद्दल लिहिले होते. त्याचे उद्योग उघडकीस आल्याने त्या रागातून त्याने या गुन्ह्यात बोठेचे नाव घेतले आहे. याशिवाय दुसरा पुरावा आणि ठोस कारण पोलिसांकडे नाही, असे महेश तवले यांनी सांगितले. न्यायाधीश दोन्ही बाजूंचा युक्तीवाद एकूण न्यायालयाने जरे हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार आरोपी पत्रकार बाळ मोठे यांचा जामीन अखेर नामंजूर केला आहे.

No comments:

Post a Comment