कोव्हिड प्रादुर्भावानंतर प्रथमच सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया विभाग सुरु - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 16, 2020

कोव्हिड प्रादुर्भावानंतर प्रथमच सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया विभाग सुरु

 नेत्रतपासणीबरोबर सुपर स्पेशालिटी शस्त्रक्रियेचे भविष्यात प्रयोजन ः डॉ. पोखरणा

कोव्हिड प्रादुर्भावानंतर प्रथमच सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया विभाग सुरु

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून सिव्हील हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यांपासून नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया विभाग हा बंद ठेवण्यात आला होता. तो मंगळवारपासून सूरु करण्यात आला असून, सर्व नेत्र रुग्ण व गरजूंनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा, तपासणीचा, डोळ्यावरील ऑपरेशनचा व बाह्य रुग्ण तपासणीचा फायदा घ्यावा, असे आवाहन सिव्हील सर्जन डॉ.सुनिल पोखरणा यांनी केले.
     याप्रसंगी अति.जिल्हा शल्स चिकित्सक डॉ.महावीर कटारिया, वैद्यकिय अधिकारी डॉ.मनोज घुगे, नेत्र शल्यचिकित्सक डॉ.संतोष रासकर, नेत्रतज्ञ डॉ.भुषण अनभुले, डॉ. अजिता गरुड, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ.अशोक गायकवाड, सेविका सुजाता चक्रनारायण, योगेश सोनटक्के आदि उपस्थित होते.
डॉ.पोखरणा पुढे बोलतांना म्हणाले, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया या सर्व मोफत असून, त्यात औषधे, रुग्णांचे जेवण, शस्त्रक्रिया, काळा चष्मा, भिंगरोपण हे सर्व मोफत दिले जाते. रुग्णाला एक दिवस अ‍ॅडमिट ड्रेसिंगसाठी केले जाते.
     भविष्यात सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेत्र रोगाच्या संदर्भातील सुपर स्पेशालिटी शस्त्रक्रिया उदाहरणार्थ रिटायनल सर्जरी, अत्याधुनिक काचबिंदू शस्त्रक्रिया, नेत्ररोपण शस्त्रक्रिया, तिरळेपणावरील सर्जरी या सुविधा सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असून, नेत्र विभागाचे भविष्यात विस्तारीकरण करण्याचे प्रयोजन आहे. जेणे करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांना या रुग्णसेवा फायदा करुन घेता येईल व यात निश्चित आम्हाला यश येईल, अशी आशा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीगणेश, श्री सरस्वती व लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे सिव्हील सर्जन डॉ.सुनिल पोखरणा यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. नारळ वाढवून या रुग्णसेवेचा शुभारंभ करण्यात आला. आज राजूर तालुका अकोले येथून आलेल्या सहा रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यावरील आवश्यक शस्त्रक्रियादेखील पार पडल्या. शेवटी डॉ.मनोज घुगे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment