येथे पाण्यासाठी नगरसेवक व सिओ यांच्या नावाचे दगड ठेवून केली पूजा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 16, 2020

येथे पाण्यासाठी नगरसेवक व सिओ यांच्या नावाचे दगड ठेवून केली पूजा.

 येथे पाण्यासाठी नगरसेवक व सिओ यांच्या नावाचे दगड ठेवून केली पूजा.                                 नगरी दवंडी


अहमदनगर - भिंगार शहर येथे कॅंटोनमेंट हद्दीमध्ये अकरा दिवसांपासून पाणी न सोडण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हा शहर संघटक मतीन सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली छावणी परिषदेवर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सात नगरसेवकांचे नावाचे दगड ठेवून व सिओ यांच्या नावाचा दगड ठेवून अशा आठ दगडांची पूजा करण्यात आली व नागरिकांना लवकरात लवकर पाणी रोज भेटावे असे साकडे घालण्यात आले व भिंगार शहराला दररोज पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देण्यात यावे अन्यथा येत्या मंगळवारी भिंगार शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे मतीन सय्यद म्हणाले.                                       भिंगार येथील कॅंटोनमेंट हद्दीतील संपूर्ण भिंगार शहरात सुमारे अकरा दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळाले नाही येथील नागरिक पिण्याच्या पाण्याला वनवन फिरत आहेत मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांचे हाल होत आहे तसेच पिण्याचे पाण्याचे टॅंकर हे मोजक्या ठिकाणीच पाणी वाटप केले जाते तेथे वॉर्ड मेंबर सांगेल तेथे पाणी वाटप केले जातात मेंबर हे त्यांच्या खिशातून पैसे देतात का व सदरील टँकरचे पैसेसुद्धा नागरिकांकडून वसूल केले जातात मग वॉर्ड मेंबर सांगेल तेथेच का पाणी पुरवले जातात अशी विचारणा मतीन सय्यद यांनी केली.       कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बोरिंग हे नादुरुस्त झाले असून कॅन्टोन्मेंट पाणी तर नाहीच मिळत तसेच बोरचे पाणी सुद्धा मिळत नाही यामुळे लोकांची व महिलांच्या मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे पिण्याचे पाणी मिळत नसल्या कारणाने वणवण फिरावे लागत आहे आपल्या कॅंटोनमेंट अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कॅन्टोनमेंट मध्ये पैसे नाही टेंडर झालेले नाही असे उडवाउडवीचे उत्तरे नागरिकांना देतात त्यामुळे या कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कारभाराला वैतागून राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तसेच भिंगार मधील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना घेऊन कॅंटोनमेंट बोर्डावर मोर्चा काढण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे अहमदनगर शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद, संभाजी भिंगारदिवे सिद्धार्थ आढाव, ईश्वर भंडारी, इब्राहिम चौधरी, निसार शेख, आसिफ शेख, मदिना शेख, नुरजहॉ शेख, गुलनाज सय्यद,अनुराधा भंडारी, शोभा भंडारी, ज्योती देवतरसे, सुशीला देवतरसे, राणी विधाते, कुसुम वागस्कर, नलिनी भिंगारदिवे, सुंदर भिंगारदिवे, सरिता पंडित, रोहिणी पंडित, नासिर शेख, स्वप्निल पवार, हाजी आरिफ, अन्सार सय्यद, जाफर शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here