अंतर्गत रस्त्याचे कामास निधी उपलब्ध करून द्यावा - सुनीता निमसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

अंतर्गत रस्त्याचे कामास निधी उपलब्ध करून द्यावा - सुनीता निमसे

 अंतर्गत रस्त्याचे कामास निधी उपलब्ध करून द्यावा - सुनीता निमसे

नगरी दवंडी

राहुरी  - टाकळीमिया गावातील  अंतर्गत  रस्त्याचे  कामास  निधी  उपलब्ध  करुन  मिळावा  अशी  मागणी  पंचायत  समितीच्या  माजी  सभापती व विद्यमान  सदस्या सौ  सुनीता  सुरेश  निमसे  ह्यांनी  आमदार लहुजी  कानडे  व खासदार  सदाशिवराव  लोखंडे  ह्यांच्याकडे  एका पत्रा द्वारे  केली  आहे.

सौ  निमसे  ह्यांनी  आमदार  व खासदार  ह्यांना  पाठविलेल्या  पत्रात  म्हंटले  की  टाकळीमिया गावातील खालील  रस्ते  अतिशय  खराब  झाले  असून  सदर  रस्ते  दुरुस्ती साठी  आपल्या  निधीतून निधी  मिळावा.

सौ  निमसे ह्यांनी  पत्रात म्हंटले की  टाकळीमिया  गावातील देशमुख वस्ती  ते  ढोबळे वस्ती ह्या रस्त्याचे खडीकरणासाठी तसेच  टाकळीमिया ते कुरण पट्टी रस्ता 3) टाकळीमिया अंतर्गत  मोढवे   वस्ती जिल्हा  परिषद  शाळा ते  शरद  मोढवे  वस्ती  पर्यंत  रस्त्याचे  खडीकरण करण्या साठी  निधी  मिळावा.

No comments:

Post a Comment