चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा बेकायदेशीर जीआर रद्द करा; अन्यथा शिक्षक भरतीचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा - सुनील गाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 14, 2020

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा बेकायदेशीर जीआर रद्द करा; अन्यथा शिक्षक भरतीचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा - सुनील गाड

 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा बेकायदेशीर जीआर रद्द करा; अन्यथा शिक्षक भरतीचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा - सुनील गाडगेनगरी दवंडी

अहमदनगर - राज्यातील शाळांमध्ये शिपाई, प्रयोगशाळा परिचर,सुरक्षारक्षक आदी चतुर्थश्रेणीतील पदे न भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ही पदे भविष्यात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यामुळे एक लाखाहून अधिक सरकारी नोकऱ्यांवर गदा येणार आहे. शाळांमधील शिपाई आदी  पदेच काढून ती कंत्राटदारांच्या घशात घालायची असतील तर सरकारने आता शाळा आणि राज्यातील शिक्षणच बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे  यांनी दिली. यासाठी आज अहमदनगर जिल्हयाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून त्यांना निवेदन देण्यात आले. 

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित  आकृतीबंध निश्चित न करता शिक्षण विभागाने ११ डिसेंबर २०२० ला ठोक मानधनावर चतुर्थश्रेणी कर्मचान्यांना नेमण्याचा निर्णय

घेतला आहे.,११ डिसेंबर २०२० चा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शती) नियमावली 1981 मधील तरतुदींशी विसंगत आहे. उपरोक्त कायदा किंवा किमान वेतन कायदा यात अदयापी विधिमंडळाने बदल केले नसल्याने अशाप्रकारे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमणे अन्यायकारक व बेकायदेशीर आहे. ,चतुर्थ श्रेणी कर्मचारी ( शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, कामठी, तेलवाला, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर इत्यादी) हे गरीब, बहुजन, मागासवर्गीय आणि अल्पसंख्य वर्गातून येतात. 

,११ डिसेंबर २०२० चा बेकायदेशीर व शिक्षणाचे कंत्राटी करण करणारा अन्यायकारक शासन निर्णय रद्द न केल्यास शिक्षक भारती राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.   हा निर्णय त्वरित मागे घ्यावा,

        शाळेची सफाई करणे, तास संपल्यावर घंटा वाजविणे, शिक्षण विभागातील कामाची कागदपत्रे पोहचविणे, आदी कामांची धुरा सांभाळणाऱ्या शिपाईचे पद रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला

आहे. याचबरोबर चतुर्थश्रेणीत येणारे हमाल, सुरक्षारक्षक, प्रयोगशाळा परिचर, सफाईगार आदी पदेही रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे; सरकार बेजबाबदार पणे वागत आहे अशी खंत शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी व्यक्त केली. शाळेचे मुख्य घटक शिपाई वा चतुर्थश्रेणी कर्मचारी मानधनावर काम करायला लागले तर चांगले कर्मचारी मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले.सध्या सेवेत असलेले कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ती पदे रद्द करण्यात येणार आहेत. यानंतर या पदांवर ठोक भत्त्यावर कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. ५०० पर्यंत विद्यार्थिसंख्या असलेल्या शाळेत दोन शिपाई नियुक्त करण्याची परवानगी आहे. या दोन शिपायांना मिळून मुंबई

व पुणे शहरात प्रतिमाह २० हजार, ही दोन शहरे वगळता इतर मनपा क्षेत्रात १५ हजार आणि ग्रामीण भागात १० हजार रुपये इतका भत्ता दिला जाणार आहे. शिपाई व्यतिरिक्तच्या दोन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मिळून अनुक्रमे १० हजार, साडेसात हजार आणि पाच हजार इतके प्रतिमाह

मानधन दिले जाईल. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कावर गदा आणणारा बेकायदेशीर जीआर रद्द करा अन्यथा शिक्षक भारतीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन केले जाईल असे  राज्य सचिव सुनिल गाडगे जिल्हाध्यक्ष  आप्पासाहेब जगताप, जिल्हा माध्यमिकचे  सचिव विजय कराळे , कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे .योगेश हराळे, उर्दू माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मोहमंद समी शेख. मुजीब शेख  उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु . उच्च माध्यमिक चे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर ङोंगरे , संभाजी पवार.  संतोष देशमुख . नवनाथ घोरपडे. गोरखनाथ गव्हाणे,हनुमंत  रायकर ,सुदाम दिघे,  . संभाजी चौधरी   महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर. सचिव विभावरी रोकडे . कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर शकुंतला वाळुंज, छाया लष्करे. जया गागरे. संध्या गावडे. अनघा सासवडकर, रेवन घंगाळे . जॉन सोनवणे  आदींनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here