श्रमदान करून स्वच्छ्ता करण्याच्या अभिनव अभियानाचा 15 डिसेंबर ला अमृत महोत्सव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

श्रमदान करून स्वच्छ्ता करण्याच्या अभिनव अभियानाचा 15 डिसेंबर ला अमृत महोत्सव

 श्रमदान करून स्वच्छ्ता करण्याच्या अभिनव अभियानाचा 15 डिसेंबर ला अमृत महोत्सव



नगरी दवंडी


कर्जत (प्रतिनिधी):-दररोज श्रमदान करून स्वच्छता करण्याच्या अभिनव अभियानाचा दि 15 डिसें रोजी अमृतमहोत्सव साजरा केला जात असून यानिमित्त कर्जत शहरात सर्व सामाजिक संघटना व नागरिकांच्या सहभागाने मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. 

                स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 अंतर्गत कर्जत शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी कंबर कसली असून शहरात श्रमदानाचे ऐतिहासिक काम उभे राहत असून येथील अनेक नागरिकांनी दररोज सकाळी साडे सहा ते साडे सात या वेळेत श्रमदान करून स्वच्छता करण्याच्या कामाला सुरुवात केली व दिवाळी दसरा पाडवा याची तमा न मानता दररोज सलग 74 दिवस शहरात वर्षानुवर्षं असलेले उकिरडे, कचऱ्याचे डेपो पाहता पाहता स्वच्छ केले, शहरातील विविध नागरिक नागरिकांनी एकत्र येत कोणत्याही संघटनेचे पक्षाचे वा व्यक्तीचे नाव न वापरता शहरात उभारलेल्या स्वच्छ कर्जत अभियानाचा 75 वा दिवस अमृत महोत्सव म्हणून दि 15 डिसें रोजी साजरा केला जाणार असून या दिवशी सकाळी श्रमदान करतानाच सायं 5 वा जनजागृतीची मशाल फेरी काढली जाणार आहे. यामध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे, या अभियानाला अनेक ज्ञात अज्ञातानी मदतीचा हाथ दिलेला असून शहरात स्वच्छतेचा जागर उभा राहिला आहे, कर्जत नगर पंचायतीने स्वच्छता विषयावर मोठे काम करण्याचा संकल्प केला आहे, सामाजिक संघटनाचे काम सुरू असताना कर्जतचे माजी नागराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आम्ही कर्जतचे सेवेकरी या नावाने अभियान उभे करून शहरात स्वतंत्र काम उभे केले आहे तर ते काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष सचिन घुले यांच्या संकल्पनेतून पै प्रवीण दादा घुले मित्रमंडळ व कर्जत शहर युवक काँग्रेसच्या वतीने बाभूळ मुक्त कर्जत अभियान उभारले असून त्याद्वारे शहरातल्या विविध ठिकाणच्या बाभळा काढल्या जात आहे, शहरातील मुस्लिम स्मशानभूमी असलेल्या कब्रस्तान चा कायापालट करण्यास सुरुवात झाली आहे, 

                 कर्जत शहरातुन वाहणाऱ्या कानवळा व लेंडी नदीच्या स्वच्छतेचे व सुशोभीकरनाचे  काम सुरू करण्यात आले आहे, यासाठी भारतीय जैन संघटनेने पोकलेन मोफत उपलब्ध करून दिले असून त्यासाठी लागणारे डिझेल कर्जत जामखेड इंटिग्रेटेड च्या वतीने दिले जाणार आहे, 

             कर्जत शहराचा श्रमदानातून स्वच्छतेच्या उभारलेल्या अभियाना तील 

श्रमप्रेमींची बैठक झाली घेऊन अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, खा. डॉ सुजय विखे,  आ. रोहित पवार यांनी भेट देऊन सर्वांची बैठक घेत कौतुक केले आहे, 

             कर्जत येथीलश्रमदानातून  स्वच्छता अभियाना ची प्रेरणा घेऊन अशाच पद्धतीने बहिरोबवाडी, कोळवडी व राशीन मध्ये अभियान उभारले असून कर्जत मधील श्रमप्रेमीनी जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिद्धटेक येथे ही श्रमदान केले आहे, 

             कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव अत्यंत सकारात्मक विचार सरणीचे लाभले असून त्याच्या पुढाकाराने नगर पंचायत अत्यंत सक्रिय झाली आहे तर श्रमदान चळवलीत तहसीलदार गटविकास अधिकारी अधून मधून सहभागी होत आहेत अधिकारी वर्गाची सकारात्मक साथ लाभत असल्याने स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत अभियानाला अधिकच गती मिळाली असून स्वच्छ सर्व्हेक्षणचे बाक्षीस मिळाल्या शिवाय स्वस्थ बसायचे नाही असा संकल्पच सर्वानी सोडला आहे.

No comments:

Post a Comment