देशात सर्वात कमी वयाची युवती महापौर झाल्याबद्दल वर्धापन दिनी भाकपचा विजयी जल्लोष - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

देशात सर्वात कमी वयाची युवती महापौर झाल्याबद्दल वर्धापन दिनी भाकपचा विजयी जल्लोष

 देशात सर्वात कमी वयाची युवती महापौर झाल्याबद्दल वर्धापन दिनी भाकपचा विजयी जल्लोष

 


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा 95 वा वर्धापन दिन व कॉ.आर्या राजेंद्रन ही देशातील सर्वात कमी वयाची युवती महापौर झाल्याबद्दल बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालया समोर फटाके वाजवून विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाकपचे जिल्हा सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा.डॉ.महेबुब सय्यद, लालबावटा विडी कामगार संघटनेच्या भारती न्यालपेल्ली, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे रामदास वागस्कर, अंबादास दौंड, भैरवनाथ वाकळे, अ.भा. किसान सभेचे विजय केदारे, दत्ताभाऊ वडवणीकर, बाळासाहेब सागडे, संतोष गायकवाड, सतीश पवार, अरूण थिटे, कार्तिक पासलकर, चंद्रकांत माळी, सुनिल ठाकरे, अनिल माळी, आसाराम भगत, प्रशांत चांदगुडे आदी उपस्थित होते. केरळ येथील थिरूअनंतपुरम महानगरपालिकेमधे देशातील सर्वात कमी वयाची युवती महापौर म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड आर्या राजेंद्रन यांची नुकतीच निवड करण्यात आली. कोणताही राजकिय वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातुन त्या पुढे आल्या आहेत. या विजयाचा जल्लोष भाकपच्या वर्धापनदिनी करण्यात आला. पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकित अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, घराणेशाही प्रस्थापितांविरोधात भाकप लढा देत आहे. तत्त्वनिष्ठा बाळगून राजकारणात देशातील युवकांना नेतृत्व देण्यासाठी भाकप कटिबध्द आहे. युवकांच्या माध्यमातून देशात बदल घडणार असून, हा विचार घेऊन देशातील सर्वात कमी वय असलेल्या युवतीला महापौर पदी विराजमान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कॉ. महेबुब सय्यद व गोकुळ बिडवे यांनी आपल्या भाषणात सत्ताधार्यांवर निशाना साधला. प्रास्ताविकात रामदास वागस्कर यांनी भाकप पक्षाची ध्येय-धोरणे व उद्दीष्टे सर्वां समोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहिरनाथ वाकळे यांनी केले. आभार अंबादास दौंड यांनी मानले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा 95 वा वर्धापन दिन व कॉ.आर्या राजेंद्रन ही देशातील सर्वात कमी वयाची युवती महापौर झाल्याबद्दल बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालया समोर फटाके वाजवून विजयाचा जल्लोष करताना भाकपचे जिल्हा सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा.डॉ.महेबुब सय्यद, लालबावटा विडी कामगार संघटनेच्या भारती न्यालपेल्ली, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे रामदास वागस्कर, अंबादास दौंड, भैरवनाथ वाकळे, अ.भा. किसान सभेचे विजय केदारे, दत्ताभाऊ वडवणीकर, बाळासाहेब सागडे, संतोष गायकवाड, सतीश पवार, अरूण थिटे, कार्तिक पासलकर, चंद्रकांत माळी, सुनिल ठाकरे, अनिल माळी, आसाराम भगत, प्रशांत चांदगुडे आदी.

No comments:

Post a Comment