कल्याण निर्मल विशाखापट्टणम महामार्गावर खाजगी बस व सेंन्ट्रो कारचा भीषण अपघात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

कल्याण निर्मल विशाखापट्टणम महामार्गावर खाजगी बस व सेंन्ट्रो कारचा भीषण अपघात

 कल्याण निर्मल विशाखापट्टणम महामार्गावर खाजगी बस व सेंन्ट्रो कारचा भीषण अपघात


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
      कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराईजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. सोमवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास सुभद्रा हॉटेल समोर त्रिभुनवाडी शिवारात खाजगी बस क्रमांक एम.एच. 38,8555 ही पुण्याहून नांदेडकडे जात असताना सँट्रो कार  एम. एच. 12 सीडी 2917 ही    पुण्याच्या दिशेने जात असताना धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात सँट्रो कारचा जागीच चुराडा झाला.यामध्ये सँट्रो कारमधील 3 जण जागीच ठार झाले. स्थानिकांनी तातडीने जखमी व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
      रामभाऊ शंकरराव कदम, (वय 60, रा जायगाव ता.परळी जि. बीड) परमेश्वर लक्ष्मण काळे (वय 40, रा.धामणगाव ता.पाथ्री जि परभणी) आणि केशव विठ्ठल बोराटे (वय 23 रा मंठा जि जालना) अशी मृतांची नावं आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 

No comments:

Post a Comment