लॉरेन्स स्वामी यांच्या पत्नी पैश्याच्या जोरावर त्रास देत असल्याचा आरोप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

लॉरेन्स स्वामी यांच्या पत्नी पैश्याच्या जोरावर त्रास देत असल्याचा आरोप

 लॉरेन्स स्वामी यांच्या पत्नी पैश्याच्या जोरावर त्रास देत असल्याचा आरोप

पाटसकर व आठवाल कुटुंबीयांचे पोलीस उपअधिक्षकांना निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः लॉरेन्स स्वामी यांच्या पत्नी वैशाली स्वामी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन माध्यमांच्या मुलाखतीमध्ये नांव घेतले असून, आमचा लॉरेन्स स्वामी यांच्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसून, पूर्ववैमनस्यातून नावे घेण्यात आले असल्याचे निवेदन शिरीष पाटसकर, प्रशांत आठवाल व प्रमोद आठवाल यांनी पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांना दिले. यावेळी वैशाली पाटसकर, विद्या आठवाल आदिंसह पाटसकर व आठवाल कुटुंबीय उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आमच्यापैकी शिरीष पाटसकर हे रक्षा मंत्रालयाचे छावणी परिषद येथे नोकरीस असून, त्यांच्यावर 376 अन्वये खोटा गुन्हा नेवासा पोलीस स्टेशन येथे लॉरेन्स स्वामी यांनी कमल वसंत जाधव हिला हाताशी धरून दाखल केला होता. हिचे लॉरेन्स स्वामी याचे कॉल रेकॉर्ड चेक करून गुन्ह्याची शहानिशा करावी. लॉरेन्स स्वामी यांना मागील काही दिवसांपूर्वी अटक झालेली आहे. त्याचा भाऊ विन्सन स्वामी, पुतण्या रेगन स्वामी, रॉनी स्वामी व मुलगा रोहन स्वामी हे आंम्हाला सतत धमकावत आहे. काही महिन्यांपूर्वी एका इसमास लॉरेन्स स्वामी यांनी फोनवर धमकी दिली होती की, प्रमोद आठवाल यालापण 376 च्या खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतवण्याची धमकी देण्यात आली. याचे कॉल रेकॉर्डिंग देखील जमा करण्यास तयार आहे. पाटसकर व प्रशांत आठवाल दोघेही केंद्रशासनाच्या छावणी परिषदेत नोकरी करीत आहेत. ज्या दरोडाप्रकरणी आरोपी असलेला अर्जुन ठुबे याची बायको कविता ठुबे व ज्योतिका रेड्डी यांच्यामार्फत गुन्हा नोंदविण्याची शक्यता आहे. तसेच सुनीता भंडारी यांच्यामार्फत ही गुन्हा नोंदवण्याची शक्यता असल्याचे म्हंटले आहे. वैशाली लॉरेन्स स्वामी व लॉरेन्स स्वामी हे पैश्याच्या जोरावर आंम्हाला हेतुपूर्वक त्रास देण्यासाठी कारस्थान करीत असल्याचा आरोप पाटसकर व आठवाल यांनी केला आहे.  लॉरेन्स स्वामी यांच्या पत्नी वैशाली स्वामी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन माध्यमांच्या मुलाखतीमध्ये नांव घेतले असून, आमचा लॉरेन्स स्वामी यांच्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसून, पूर्ववैमनस्यातून नावे घेण्यात आले असल्याचे निवेदन शिरीष पाटसकर, प्रशांत आठवाल व प्रमोद आठवाल यांनी पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांना दिले. 

No comments:

Post a Comment