जय आनंद महावीर युवक मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

जय आनंद महावीर युवक मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

 जय आनंद महावीर युवक मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः  सन 2020 हे वर्ष करोनामुळे सर्वांसाठीच अग्निपरीक्षेचे ठरले. या काळात मानवतेची मोठी परीक्षा जगाने दिली. मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाची दिनदर्शिका तयार केली आहे. यात फक्त तारखाच नाहीत तर सर्व सणवार, महत्त्वाच्या दूरध्वनी क्रमांकाची समग्र माहिती आहे.  अतिशय सुंदर दिनदर्शिकेपमाणेच येणारे नवीन वर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी व आनंदाचे ठरावे, असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.
     नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या सन 2021 या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नरेंद्र फिरोदिया  व अनिल पोखरणा यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मर्चंटस् बँकेचे संचालक अनिलकुमार पोखरणा, सो ऍण्ड सोचे संचालक केतन मुथा, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेके्रटरी हेमंत मुथा, ज्येष्ठ सदस्य बाबालाल गांधी, ललित बनभेरु, प्रकाश गांधी, सत्येन मुथा, योगेश मुनोत, विनोद भंडारी, अमित गांधी, रोनक मुनोत, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते.
अनिलकुमार पोखरणा म्हणाले की, सातत्यशील व समाजपयोगी उपक्रम जय आनंद मंडळाचे वैशिष्ट्य आहे. दिनदर्शिकतेची गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट आहे.  दिनदर्शिकेसाठी हेमंत मुथा, अमित गांधी, ललित बनभेरु, बाबालाल गांधी, प्रकाश गांधी, रिध्दीसिद्धी ऑफसेटचे मनिष झंवर यांनी विशेष सहकार्य  केल्याचे मुनोत यांनी सांगितले. शेवटी सेक्रेटरी हेमंत मुथा  यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment