अहमदनगर महाविद्यालयात नाताळ सण उत्साहात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

अहमदनगर महाविद्यालयात नाताळ सण उत्साहात साजरा

 अहमदनगर महाविद्यालयात नाताळ सण उत्साहात साजरा


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महाविद्यालयात नाताळ सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत येत असतो. दरवर्षी दि.20 ते 22 डिसेंबरमध्ये अहमदनगर महाविद्यालयात चॅपल (चर्च)मध्ये साजरा करण्यात येतो आणि यानंतर महाविद्यालयात सुट्टी जाहीर होते. यंदा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे महाविद्यालये बंद असल्याने यंदाचा नाताळ उत्सव हा महाविद्यालयात साजरा होईल की नाही, याबाबत संभ्रम होता. परंतु उत्साही विद्यार्थी आणि शिक्षकांनी मागील काही दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत अथक परिश्रम करत प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे नियोजन केले. आपली प्रॅक्टिस निरंतर सुरु ठेवत, आवश्यकतेनुसार  भव्य दिव्य सेट तयार करण्यात आले. चर्चला रोशनाई केलेली आहे. विविध विद्यार्थ्यांच्या ग्रुप साँगने धमाल केली. अशा या पवित्र वातावरणात हा पवित्र नाताळ सण विद्यार्थी आणि काही शिक्षकांच्या मदतीने साजरा करण्यात आला.
     सदर कार्यक्रमाचे संपूर्ण प्रोफेशनल पद्धतीने चित्रीकरण करण्यात आले आणि दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. युट्यूब प्रिमिअरवर प्रसारित करण्यात आले. सदर ऑनलाईन नाताळ कार्यक्रमाचा समस्त आजी-माजी विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. हजारो लाईक्स मिळवत कार्यक्रमाचे चित्रीकरण संपूर्ण देश-विदेशात प्रसारित झाले.
     याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस म्हणाले, विविध सण उत्सव ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीतून आपणास अनेक गोष्टी शिकण्यास मिळतात. हे सण आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. यातून आपणास उर्जा व प्रेरणा मिळत असते.  सर्वांना एकत्र घेऊन एका धाग्यात गुंफण्याचे काम यानिमित्त होत असते. त्याचबरोबर संस्कृती व चाली-रितेचे आदान प्रदान यानिमित्त होत असते. यावेळी विद्यार्थ्यांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमास प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. यासाठी प्रा.फिलिख अब्राहम, अरुण बळीद, विनय रननवरे, सुजाता लोंढे, उज्वला गायकवाड, श्रद्धा त्रिभुवन, सानिका जाधव, प्रा. प्रतुल कासाटे, प्रा.गौरव मिसाळ आदिंनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment