वाहन चालकांस अडवून लूटमार करणारी टोळी जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

वाहन चालकांस अडवून लूटमार करणारी टोळी जेरबंद

 वाहन चालकांस अडवून लूटमार करणारी टोळी जेरबंद


नगरी दवंडी/प्रतिनिधी

सुपे ः पुणे-नगर महामार्गावरील म्हसणे टोलनाक्यावर पुण्याकडे जाणाऱया मारुती मोटारचालकाला आडवून रोकडसह ऐवज लुटणाऱया टोळीतील पाच जणांना सुपे पोलिसांनी अटक केली. सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या पथकाने दीड तासात मुद्देमालासह पाच जणांना जेरबंद केले. या टोळीतील एकजण फरार झाला. या टोळीला जेरबंद केल्यामुळे सुपे परिसरात लूटमारीसह अनेक मोठी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
         नयन राजेंद्र तांदळे (वय 26, रा. भिस्तबाग चौक, नगर), विठ्ठल भाऊराव साळवे (रा. झापवाडी, ता. नेवासा), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (रा. सावेडी, नगर), शाहुल अशोक पवार (वय 31, रा. सुपा, ता. पारनेर), अमोल छगन पोटे (वय 28, रा. सुपे, ता. पारनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
          सदर घटनेची हकीकत अशी की पुणे येथील पी. के. रबर कंपनीतील चालक अक्षय तात्याराम चखाले (वय 24, रा. मोरेवस्ती, निगडी, ता. हवेली, जि. पुणे) हे नगरला मामाला भेटून रात्री पुण्याला निघाले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे वाहन म्हसणे टोलनाका ओलांडून पुढे गेल्यावर दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांची गाडी अडविली. त्यातील एकाने अक्षय याच्या गळयाला चाकू लावून त्याच्याकडील रोखडसह ऐवज लुटला. त्यानंतर दुचाकीवरील तरुण नगरच्या दिशेने पसार झाले होते.
          या घटनेनंतर चखाले यांनी सुपे पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे हे त्यांच्या पथकासह आरोपींच्या मागावर निघाले. उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, खंडेराव शिंदे, खैरे, पटेल, अतुल रोकडे यांच्यासह महामार्गावर गस्त घालीत असताना मध्यरात्री जातेगाव घाटात दोन दुचाकीवर सहाजण बसलेले त्यांना दिसले. पोलिस निरीक्षक गोकावे यांनी चौकशी केली असता नयन तांदळे याच्याकडे फिर्यादी चालक अक्षय चखाले याचे आधारकार्ड आणि चाकू आढळला, तर इतर विठ्ठल साळवे, अक्षय ठोंबरे, शाहुल अशोक पवार, अमोल पोटे यांच्याकडेही चाकू आणि मिरचीची पूड आढळली. त्यांच्या कडील आढळलेल्या वस्तू व ऐवज जप्त करून सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यातील एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

No comments:

Post a Comment