नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण व ड्रेनेज कामाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 14, 2020

नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण व ड्रेनेज कामाचा शुभारंभ

 नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण व ड्रेनेज कामाचा शुभारंभ

शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या कामाना प्राधान्य दिले- विक्रम राठोड

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः प्रभागातील नागरिकांना मुलभुत सुविधा देणे हे नगरसेवकांचे प्रथम कर्तव्य आहे. या मुलभुत सुविधांबरोबरच प्रभागाचा विकास कसा होईल, याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची नाळ सर्वसामान्यांशी जोडली गेलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विकास कामांना खिळ बसली होती. या काळातही शिवसेनेने विकास कामांबरोबरच नागरिकांना दिलासा देणारे उपक्रम राबविलेे. परंतु आता परिस्थित सामान्य होत असतांना सुविधाही देणे गरजेचे आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांकडे शिवसेनेच्या नगरसेवकांनी निधीची मागणी केली आहे, त्यातून विकास कामांना चालना मिळेल.  शिवसेना नगरसेवक हे कायम नागरिकांच्या संपर्कात असल्याने अनेक कामे मार्गी लागत आहेत, असे प्रतिपादन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केले.
    नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या प्रयत्नातून हॉटेल राज पॅलेस ते श्री मार्बल येथील रस्ता डांबरीकरण व ड्रेनेज कामाचा शुभारंभ युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम, दत्ता जाधव, गणेश कवडे, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड, संतोष गेनप्पा, योगीराज गाडे, हरजिभाई पटेल, पुरुषोत्तम पटेल, नरसीभाई पटेल, हिंमतभाई पटेल आदि उपस्थित होते. याप्रसंगी सौ.सुवर्णा जाधव म्हणाल्या, प्रभागातील प्रत्येक भागातील कामांना प्राधान्य देऊन ते सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहेत. निधी अभावी अनेक कामे रखडलेली आहेत. परंतु टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहेत. टिळक रोड परिसरातील रस्ता व  ड्रेनेज लाईनच्या सुरु होणार्या कामामुळे या भागातील  प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. चांगले काम होण्यासाठी नागरिकांनीही होणार्या कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. आम्ही आपले प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहू, असे सांगितले. याप्रसंगी अनिल शिंदे म्हणाले, प्रभागाच्या विकासात आम्ही सर्व नगरसेवक एकत्रित प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच प्रत्येक भागात विकास कामे होत आहे. भविष्यातही अनेक कामे होतील. विकास कामास विलंब होत असला तरी  आमचा कायम पाठपुरावा सुरु असतो. प्रभागातील नागरिकांना चांगली सेवा देणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. यावेळी गणेश कवडे यांनीही शिवसेना नगरसेवक नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडवित आहेत. त्यासाठी प्रसंगी आंदोलने करण्यात आली आहेत. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांचे कामांबाबत नेहमीच अग्रही असतात. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम आदिनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मंजीभाई पटेल, अमृतभाई शाह,  जिवराजभाई पटेल, मौजीभाई पटेल, मगनभाई पटेल, इसहाक शेख, रमेशभाई पटेल,  इकबाल शेख, परागभाई पटेल, चंदनभाई पटेल, अविनाश पटेल, योगेश पटेल, विनायक कानडे, प्रविण कानडे, हर्षल भणभने, गणेश जाधव, सुरज जाधव, ऋषीकेश जाधव, रवी जाधव, विशाल जाधव, विशाल गायकवाड, आदेश जाधव, बाळासाहेब बेल्हेकर आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here