जय आनंद महावीर युवक मंडळाची कार्यकारिणी जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 14, 2020

जय आनंद महावीर युवक मंडळाची कार्यकारिणी जाहीर

 जय आनंद महावीर युवक मंडळाची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी शैलेश मुनोत,तर सेक्रेटरीपदी हेमंत मुथा

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः नवीपेठ येथिल जय आनंद महावीर युवक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी शैलेश मुनोत यांची फेरनिवड झाली असून सेक्रेटरी पदी हेमंत मुथा यांची निवड झाली आहे. मंडळाच्या सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने कार्यकारिणी निवडण्यात आली.
कार्यकारिणीत मंडळाच्या उपाध्यक्षपदी शरद मुथा व सचिन कोठारी, सहसेक्रेटरीपदी योगेश मुनोत, खजिनदारपदी अमित गांधी, सहखजिनदारपदी चेतन गुगळे यांची निवड झाली आहे.अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले की, मागील वीस वर्षापासून आपण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहोत. आचार्यश्री, भगवान महावीर यांना अभिप्रेत असलेली मानवसेवा करण्याच्या कार्यात सगळे एकदिलाने योगदान देतात. आताच्या करोनाच्या संकट काळात आपण अनेकांना मदत करू शकलो. भविष्यात आपण अशाच एकजुटीने नवनवीन समाजपयोगी काम चालुच ठेऊ. सेक्रेटरी हेमंत मुथा म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात नावाजलेल्या मंडळाच्या सेक्रेटरी पदी निवड झाल्याने एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. सर्वांनी दाखवलेल्या विश्र्वासास पात्र राहू असे काम करण्याचा प्रयत्न राहील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here