जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक काळा पहाड यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 14, 2020

जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक काळा पहाड यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार

 जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक काळा पहाड  यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार



नगरी दवंडी

नगर: पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथील तरुण उपसरपंच उद्धव अशोक काळापहाड यांनी सरपंच बापू गोरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. 

30 जुलै 2018 रोजी काळापहाड यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला होता. सुमारे अडीच वर्षाच्या कार्यकाळात बंधारे, नदी खोलीकरण,घरोघरी शौचालये, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे, गॅसचे वाटप,कोरोना काळात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप, वैयक्तिक खर्चातून प्राथमिक शाळेला मदत तसेच गोरगरीब कुटुंबांना  किराणा किटचे वाटप केले. इतर सदस्यांना संधी मिळावी यासाठी काळापहाड यांनी हा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. इथून पुढच्या काळातही गावासाठी भरीव योगदान देऊ असं सांगत सरपंच आणि ग्रामपंचायत ला सहकार्य करू असं सांगितले. माजी सरपंच भीमराज सोनावणे, कैलास गीते, बबन गीते, किरण काळापहाड यांच्या सहकार्याने निवडणूक लढवून गावच्या राजकारणात प्रवेश केला.गावातील अनेक मान्यवरांनी उद्धव  काळापहाड यांचे नेतृत्व मान्य केले. काळापहाड हे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक असलेले काळापहाड यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करून आभार मानण्यात आले. सरपंच बापूसाहेब गोरे,ग्रामसेविका श्रीमती कंठाळे, सदस्य विद्या गीते, संतोष डफळ, चरणदास आव्हाड,लता पालवे,संगीता आव्हाड यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment