वाढीव बिल रक्कम 3 दिवसात न दिल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

वाढीव बिल रक्कम 3 दिवसात न दिल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द!

 वाढीव बिल रक्कम 3 दिवसात न दिल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द!

“आम्ही वेळोवेळी हॉस्पिटलशी संपर्क ठेवून आहोत, त्यांना याबाबत आधीही नोटीसा पाठविल्या आहेत. आता त्यांना शेवटची नोटीस दिलेली आहे. त्यामध्ये जर संबंधित हॉस्पिटलकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही, तर 3 दिवसांनी संबंधित हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करु  
 -  श्रीकांत मायकलवार  
(आयुक्त मनपा)

“संबंधित हॉस्पिटलकडून सदर रुग्णांचे पत्ते सापडत नसल्याचे कारण देण्यात येत आहे. तर मनपानेच शहरात रिक्षा फिरुन याबाबत आवाहन करावे, तसेच स्थानिक वृत्तपत्रांत त्याबाबत जाहीर करावे - सचिन डफळ (जिल्हाध्यक्ष मनसे)


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील कोरोना पेशंटकडून जादा रक्कम घेतलेल्या हॉस्पिटलने जादा घेतलेली रक्कम परत न केल्याने संबंधित हॉस्पिटलवर इतके दिवस उलटून देखील महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नसल्याचे दिसून आल्यामुळे हॉस्पिटल चालकांना महानगरपालिकेचे आयुक्त व संबंधित पदाधिकारी पाठीशी घालतांना दिसत आहेत. त्यामुळे रुग्णांना वाढीव बिलाची रक्कम परत मिळावी व जे हॉस्पिटल वाढीव बिलाची रक्कम परत करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने आज मनपा आयुक्तांच्या दालनात झोपून ठिय्या आंदोलन केले.
    यावेळी सचिव नितीन भुतारे म्हणाले की,  करोना काळातील करोना रुग्णांवरील वाढीव बिलाची रक्कम परत करण्याचे आदेश महानगरपालिकेने शहरातील 13 हॉस्पिटलला दिले होते व वाढीव बिलाची रक्कम सदर रुग्णांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते. सदर रक्कम रुग्णांच्या खात्यावर सात दिवसांच्या आत जमा करावी. अन्यथा महानगरपालिका कारवाई करणार असलयाचे पत्र सदर 13 हॉस्पिटलला दिले. परंतु आजपर्यंत 48 लाख रुपये एवढी मोठी रक्कम परत करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले असताना 2 महिने उलटून देखील फक्त 1 लाख 71 हजार रुपये 3 हॉस्पिटलने परत केले असून अजून जवळपास 47 लाख रुपये रुग्णांना परत करण्याचे असताना देखील खाजगी हॉस्पिटलनी उपजिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे भुतारे यांनी सांगितले.
    या आंदोलनात मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, मनोज राऊत, अ‍ॅड.अनिता दिघे, अशोक दातरंगे, पोपट पाथरे, गणेश शिंदे, तुषार हिरवे, अमोल बोरुडे, रतन गाडळकर, गणेश मराठे, दिपक दांगट, संकेत व्यवहारे, अभिनय गायकवाड, आकाश कोल्हार, आकाश पवार, इंजि.विनोद काकडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment