कोरोनाव्हायरस चा नवा ट्रेन स्प्रेडर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

कोरोनाव्हायरस चा नवा ट्रेन स्प्रेडर

 70 टक्के अधिक वेगाने पसरणारा..

कोरोनाव्हायरस चा नवा ट्रेन स्प्रेडर

भारतात कोरोना ग्रस्तांची संख्या कमी होत असताना या विषाणूमध्ये बदल झाल्याचं समोर आल्याने चिंता पुन्हा वाढली आहे. कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. नवीन प्रकारच्या या कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. हा नवा प्रकाराचा विषाणू 70 टक्के अधिक वेगाने पसरतो आणि म्हणूनच त्याला ’सुपर स्प्रेडर’ असंही म्हटलं आहे. मात्र, या नव्या प्रकाराच्या कोरोना विषाणूची लागण झालेली एकही व्यक्ती सध्यातरी भारतात आढळली नसल्याचं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.

    प्रत्येक विषाणू हा स्वतःमध्ये बदल करत असतो. त्याला म्युटेशन असं म्हणतात. विषाणू म्युटेट होऊन म्हणजेच स्वतःच्या संरचनेत काही बदल करून नवीन प्रकाराच्या विषाणूत रुपांतरित होतो. यालाच विषाणूचा नवा स्ट्रेन असं म्हणतात.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डेटानुसार भारतात अ‍ॅक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. मंगळवारी अ‍ॅक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या होती - 2,92,518. गेल्या 163 दिवसांतली ही सर्वांत कमी आकडेवारी आहे. आपण चांगल्या स्थितीत आहोत आणि आपण हाच वेग कायम ठेवला पाहिजे. यापुढेही सावधगिरी बाळगून विषाणूवर आळा घालता येईल. युकेमध्ये विषाणूमध्ये बदल झाल्याचं आढळून आलं आहे. युकेतील संशोधकांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं आहे की विषाणूमध्ये झालेल्या बदलामुळे त्यांची लागण होण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या विषाणूची संक्रमित करण्याची क्षमता 70% असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे हा विषाणू ’सुपर स्प्रेडर’ बनल्याचं आपण म्हणू शकतो. कोरोना विषाणूमध्ये काही बदल घडून आले असले तरी त्यामुळे आजाराची तीव्रता वाढलेली नाही. इतकंच नाही तर मृत्यूदर किंवा हॉस्पिटलायझेशनच्या दरावरही त्याचा परिणाम झालेला नाही. युकेमध्ये कोरोना विषाणूचा जो नवीन स्ट्रेन आढळला आहे तो सध्यातरी भारतात आढळलेला नाही. त्यामुळे चिंतेचं किंवा घाबरण्याचं कारण नाही. सध्या आपल्याला केवळ सावध रहायला हवं.

No comments:

Post a Comment